Home /News /videsh /

कोरोना व्हॅक्सिनची गॅरंटी नाही? उत्पादन सुरू झाल्यानंतर या देशाच्या पंतप्रधानांचा धक्कादायक खुलासा

कोरोना व्हॅक्सिनची गॅरंटी नाही? उत्पादन सुरू झाल्यानंतर या देशाच्या पंतप्रधानांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी असं वक्तव्य केलं आहे की, कोरोनाचे व्हॅक्सिन मिळेल की नाही याची काही गॅरंटी नाही.

    लंडन, 12 मे : कोरोनाचे (Coronavirus) थैमान जगभरामध्ये वाढू लागले आहे. त्यामुळे जगातील अनेक देश कोरोनाला हरवणारी लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार करण्यात आलेल्या व्हॅक्सिनचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. सप्टेंबरपर्यंत लाखो लोकांसाठी डोस बनून तयार होईल असा दावा या युनिव्हर्सिटीने केला आहे. दरम्यान व्हॅक्सिनचे काही ट्रायल पूर्ण होण्याआधीच त्याचे उत्पादन सुरू करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाची अशी गंभीर परिस्थिती असताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी असं वक्तव्य केलं आहे की, कोरोनाचे व्हॅक्सिन मिळेल की नाही याची काही गॅरंटी नाही. ब्रिटनमध्ये अनेक वेगवेगळ्या संस्था कोरोना व्हॅक्सिनवर काम करत आहेत. दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी असं मत व्यक्त केलं आहे, कदाचित हा आजार दीर्घकाळासाठी राहील. (हे वाचा-दिलासा की चिंता? कोरोनाच्या दहशतीत 'या' आजाराचे रुग्ण कमी झाले) कोरोनाची सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जॉन्सन असं म्हणाले की, 'मी आशा, आशा आणि केवळ आशा करतो आम्ही असं व्हॅक्सिन बनवू की कोरोना व्हायरसला हरवू शकू. ऑक्सफर्डमधून धैर्य वाढवणाऱ्या गोष्टी ऐकू येत आहेत.' मात्र हे सांगताना त्यांनी इशारा देखील दिला आहे. या व्हॅक्सिनबाबत खात्री नसल्याचं ते म्हणाले. सार्सचं उदाहरण देत जॉन्सन म्हणाले की, 18 वर्षानंतर सुद्धा आपल्याकडे सार्सवर व्हॅक्सिन नाही आहे. त्यामुळे दीर्घकाळासाठी या परिस्थिती आपाल्याला राहावं लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे या व्हॅक्सिनसाठी सरकार खूप पैसे खर्च करत असल्याचंही ते म्हणाले. (हे वाचा-चीनच्या शेजारी देशानं कोरोनाला हरवलं, लस किंवा औषध नाही तर 'हे' अस्त्र आलं कामी) पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भविष्यात कोरोनामुळे उद्भवणाऱ्या अन्य इन्फेक्शनबाबतही यावेळी इशारा दिला. याकरता अधिक स्मार्ट काम करावं लागेल असंही ते म्हणाले.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या