मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बोरिस जॉन्सन यांची वादग्रस्त राजकीय कारकिर्द; मेयर असताना गर्लफ्रेंडसाठी केला होता सत्तेचा गैरवापर

बोरिस जॉन्सन यांची वादग्रस्त राजकीय कारकिर्द; मेयर असताना गर्लफ्रेंडसाठी केला होता सत्तेचा गैरवापर

बोरिस जॉन्सन त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सतत वादात राहिले आहेत. आता जॉन्सन यांच्याशी निगडीत राजकीय वाद ज्यामुळे त्यांचं करिअर उध्वस्त झालं.

बोरिस जॉन्सन त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सतत वादात राहिले आहेत. आता जॉन्सन यांच्याशी निगडीत राजकीय वाद ज्यामुळे त्यांचं करिअर उध्वस्त झालं.

बोरिस जॉन्सन त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सतत वादात राहिले आहेत. आता जॉन्सन यांच्याशी निगडीत राजकीय वाद ज्यामुळे त्यांचं करिअर उध्वस्त झालं.

लंडन, 12 जुलै :  ब्रिटनमध्ये राजकीय संकटामुळे बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचं जाहीर केलं. आणि याचदरम्यान बोरिस जॉन्सन यांच्याशी निगडीत अनेक गोष्टींची चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. जॉन्सन यांचं 2008 मधील एक प्रकरण यामध्ये चांगलंच चर्चेत आहे. 2008 मध्ये जॉन्सन लंडनचे मेयर म्हणजेच महापौर आणि हेनलेमधून संसदीय प्रतिनिधी होते. तेव्हा बोरिस यांचं एका मुलीवर प्रेम होतं. तिला सिटी हॉलमध्ये नोकरी मिळावी यासाठी जॉन्सन यांनी प्रयत्न केले होते. जॉन्सन यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर केला या कारणावरून आता त्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संडे टाईम्सच्या वृत्तानुसार ही तरुणी आणि जॉन्सन यांच्यातील वाढती जवळीक अशा प्रकारच्या जॉबसाठी योग्य नाही, असं किल्ट मेल्टहाउस यांनी सांगितलं होतं. त्यामुळेच या तरुणीची सिटी हॉलमध्ये होणारी नियुक्ती रोखण्यात आली होती, असंही संडे टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. अगदी आतापर्यंत किल्ट मेल्टहाउस हे जॉन्सन यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते आणि ती तरुणी अन्य दुसरी कोणीही नव्हती तर ती युवती म्हणजे जॉन्सन यांची पत्नी आहे. या दोघांना आता चार मुलेही आहेत. अमेरिकी बिझनेस वुमनसोबतही होतं अफेअर जॉन्सन यांच्यावर आणखी एका प्रकरणात दोषी आढळल्याचा आरोप आहे. त्यांनी लंडनचे मेयर असताना अमेरिकन महिला व्यावसायिक (American Buisness Woman) जेनिफर एक्र्यूरी हिला सरकारी पैशांचा वापर करून बिझनेस ट्रिपवर पाठवलं होतं, असा आरोप जॉन्सन यांच्यावर आहे. जॉन्सनबरोबर आपलं अफेअर होतं हे नंतर एक्र्यूरी यांनी मान्य केलं होतं. संडे टाईम्सच्या वृत्तानुसार 2017 मध्ये या दोघांमधल्या संभाषणाची एक रेकॉर्डेड टेप उघड झाली. त्यानुसार 2008 मध्ये या दोघांमध्ये काही काळासाठी संबंध होते हे स्पष्ट होतं. त्यावेळेस जॉन्सन यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना 4 मुलंही होती. बोरिस जॉन्सन त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सतत वादात राहिले आहेत. आता जॉन्सन यांच्याशी निगडीत राजकीय वाद ज्यामुळे त्यांचं करिअर उध्वस्त झालं. द पिंचर अफेयर (The Pincher Affair) या आठवड्यात जॉन्सन सरकारमधून मोठ्या संख्येनं राजीनामे देण्यात आल्यानंतर द पिंचर अफेअरबद्दलही आणखी एक गोष्ट समोर आली आहे. जॉन्सन यांच्या कार्यालयानं संसदीय सदस्य क्रिस्टोफर पिंचर यांच्याविरोधात आधीच्या लैंगिक अत्याचाराबद्दल असलेल्या आरोपांची चुकीची माहिती दिल्याचं एका ज्येष्ठ माजी सरकारी कर्मचाऱ्यानं सांगितलं आहे. फेब्रुवारी महिन्यात जॉन्सन यांनी अन्य काँझर्व्हेटिव्ह संसदीय सदस्यांना जबाबदारी देताना पिंचर यांची डेप्युटी चिफ व्हीपपदी नियुक्ती केली होती. पिंचर यांनी दारुच्या नशेत असताना इतरांना लज्जास्पद अशी स्थिती निर्माण केली होती. त्यानंतर पिंचर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप असल्याचंही समोर आलं होतं. पार्टीगेट (Partygate) सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या पार्टीमधील एका घोटाळ्याचा उल्लेख करताना पार्टीगेट असा शब्दप्रयोग करण्यात आला होता. कोविड-19 (COVID-19) च्या वेळेस लॉकडाउनचे कडक नियम असतानाही पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान कार्यालयात (PM Office) एका पार्टीचं आयोजन केलं होतं. बर्थडे पार्टीत सहभागी झाल्याबद्दल पोलिसांनी जॉन्सन यांना दंडही ठोठावला होता. लॉकडाउनच्या काळात सुरु असलेल्या या अवैध पार्टी अत्यंत धोकादायक असल्याचं एका ज्येष्ठ सिव्हील कर्मचाऱ्यानं त्याच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. त्याचबरोबर तिथे आलेल्या कर्मचाऱ्यांनी जास्त दारु प्यायल्याचं आणि त्यांना उलट्या झाल्याची उदाहरणंही या रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. जॉन्सन यांनी केली दिशाभूल,चौकशी सुरु जॉन्सन यांनी अशा प्रकारच्या अवैध पार्टी आपल्याला माहिती नसल्याचं सांगत वारंवार संसद सदस्यांची दिशाभूल केली होती का, याबद्दल आता संसदेकडून चौकशी केली जात आहे. त्यावेळेस कोणताही कायदा मोडण्यात आलेला नाही असा आपल्याला प्रामाणिक विश्वास होता, असं जॉन्सन यांचं म्हणणं आहे. पण आता मात्र आपल्याकडून चूक झाल्याचं जॉन्सन यांनी मान्य केलं आहे. अन्य सेक्स स्कँडल जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह (Conservatives) पक्षाच्या सदस्यांवर अन्य आरोपही ठेवण्यात आले आहेत. यात लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचाही समावेश आहे. त्यापैकी दोन खासदारांनी राजीनामेही दिले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये कंझर्व्हेटिव्हज गेल्या महिन्यात त्यांच्या जागी झालेल्या विशेष निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते. कंझर्व्हेटिव्ह खासदार इम्रान अहमद खान 15 वर्षांच्या मुलाचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळले होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. तर आणखी एक खासदार नील पॅरिश यांनी हाउस ऑफ कॉमन्समध्ये आपल्या फोनवर दोन वेळेस पॉर्नोग्राफी बघितल्याचं मान्य केल्यानंतर राजीनामा दिला होता. तर आणखी एका कंझर्व्हेटिव्ह खासदारालाही बलात्कार, लैंगिक शोषण आणि अन्य गुन्ह्यांच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. या खासदाराला मे महिन्यात जामीन मिळाला होता आणि त्या कथित पीडितेच्या संरक्षणासाठी म्हणून मीडियापासून तिची ओळख लपवण्यात आली होती. ओव्हेन पॅटर्सन अफेअर गेल्यावर्षी संसदेच्या मानक समितीनं कंझर्व्हेटिव्ह खासदार आणि माजी मंत्री ओव्हेन पॅटर्सन यांना 30 दिवसांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली होती. पॅटर्सन यांनी त्यांना पैसे देणाऱ्या कंपन्यांसाठी लॉबिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. कंझर्व्हेटिव्ह सदस्यांनी संसदेत पॅटर्सन यांचं निलंबन रोखण्यासाठी आणि संसदीय सदस्यांच्या चौकशीची प्रक्रिया बदलण्यासाठी मतदान केलं होतं. त्यानंतर त्याची बातमी झाल्यानंतर पॅटर्सन यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर प्रस्तावित असलेल्या सुधारणाही सरकारने रद्द केल्या. पॅटर्सन यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेली निवडणूक कंझर्व्हेटिव्ह हरले होते. नूतनीकरणाची चौकशी जॉन्सन यांच्या डाउनिंग स्ट्रीट येथील फ्लॅटचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. एका सेलिब्रिटी डिझायनरच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या नूतनीकरणाचं तसंच सोन्याच्या वॉलपेपरच्या देणगीबद्दल योग्य रिपोर्ट देण्यात कंझर्व्हेटिव्ह अयशस्वी झाले होते. त्यामुळे ब्रिटनच्या निवडणूक आयोगानं कंझर्व्हेटिव्हजना 17,800 पाउंडांचा दंड ठोठावला होता. ज्यांना ही देणगी देण्यात आली होती त्यांच्याबरोबरच्या व्यवहारांबाबत खुलासा करण्यात अयशस्वी ठरल्यानं जॉन्सन यांच्या नैतिक सल्लागारांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. अर्थात जॉन्सन याबद्दल जाणीवपूर्वक खोटं बोलले नव्हते असा निष्कर्षही त्यांनी काढला होता. एकूणच बोरिस जॉन्सन यांची राजकीय कारकीर्द वादळीच आहे आणि त्यांचं हे राजीनामाप्रकरणही चांगलंच वादळी ठरलं आहे.
First published:

Tags: Britain, Politics

पुढील बातम्या