पाकिस्तान, 05 सप्टेंबर: आज सकाळी पाकिस्तानच्या (Bomb Blast in Pakistan) बलुचिस्तान प्रांतात बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 3 सुरक्षा कर्मचारी ठार झाले असून जवळपास 20 लोक जखमी झालेत. क्वेटामधील मस्तुंग रोडवर असलेल्या एका चेकपोस्टवर हा आत्मघाती हल्ला झाल्याचं वृत्त आहे. बलुचिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) या हल्ल्याला दुजोरा दिला असून सोहाना खान एफसी चेकपोस्टला (Pakistan Bomb Blast Today) लक्ष्य केल्याचं म्हटलं आहे. प्रवक्त्यानं सांगितलं की, सीटीडीचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू करण्यात आला आहे.
स्फोटानंतर तात्काळ पोलीस, कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि बचाव अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना शेख जैद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोराने त्याची मोटारसायकल चेकपोस्टवर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीच्या वाहनावर घुसवली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर तत्काळ तपास करण्यासाठी बॉम्ब निकामी युनिट घटनास्थळी पोहोचले.
Twitter च्या मैदानात शमीच्या यॉर्करवर ऋषभ पंत क्लीन बोल्ड! जाणून घ्या काय आहे प्रकरण
त्याचवेळी आता पाकिस्तान तहरीक-ए-तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची बातमी मिळाली आहे. प्राथमिक अहवालांनुसार, या हल्ल्यात फ्रंटियर कॉर्प्स (पाकिस्तान सुरक्षा दल) ला लक्ष्य करण्यात आलं आहे.
गेल्या महिन्यात भीषण हल्ला
गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाही बलुचिस्तानमधील जरगुन रोडवरील युनिव्हर्सिटी चौकात पोलीस व्हॅनला लक्ष्य करून पोलीस व्हॅनवर हल्ला करण्यात आला होता. ज्यात 15 पोलीस कर्मचारी होते. यातील दोन पोलीस ठार झाले आणि अन्य जखमी झाले (Pakistan TTP Attack) होते.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.