Home /News /videsh /

राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात एकापाठोपाठ बॉम्बस्फोट, पाहा हा VIDEO

राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात एकापाठोपाठ बॉम्बस्फोट, पाहा हा VIDEO

अशी परिस्थितीत निर्माण झाल्यानंतरही काही काळ गनी हे भाषण देतच होते.

    काबुल, 09 मार्च : अफगानिस्तानमध्ये आज एक धक्कादायक घटना पाहण्यास मिळाली. अफहानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी आज राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यावेळी भरसभेत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोट झाल्यामुळे गनी यांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं. काबूलमध्ये सत्ता संघर्ष तीव्र झाला आहे. अशात अशरफ गनी यांनी आज राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. सभा सुरू असतानाच एकापाठोपाठ अनेक स्फोट झाले. स्फोट झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. सभेला उपस्थितीत असलेल्या लोकांमध्ये एकच गदारोळ उडाला. पण, अशी परिस्थितीत निर्माण झाल्यानंतरही काही काळ गनी हे भाषण देतच होते. 'मी अल्लाहच्या नावाने शपथ घेतोय. पवित्र इस्लाम धर्माचं पालन करेन आणि त्याची रक्षा करेल. मी आपल्या राज्यघटनेचा सन्मान करेन आणि राज्यघटनेनुसारच सरकार चालवणे', अशी शपथ गनी यांनी घेतली. या शपथविधीाल देश विदेशातील मोठे नेते हजर होते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत गनी यांचा विजय झाला होता. परंतु, गनी यांच्या विजयामुळे अब्दुल्ला यांच्यात वाद निर्माण झाला होता. अब्दुल्ला अब्दुल्ला यानेही शपथ घेतली. त्याने आपल्या शेकडो समर्थकांसह अफगानिस्तान स्वतंत्र ठेवण्यासाठी शपथ घेतली. अब्दुल्ला याने शपथ घेतल्यामुळे काबूलमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. तर दुसरीकडे तालिबानी दहशतवाद्यांनी चर्चा करण्याची योजनाही पुढे ढकलण्यात आली आहे. न्यूयाॅर्कमध्ये आणीबाणी, कोरोना व्हायरसमुळे 19 जणांचा मृत्यू दरम्यान, अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शनिवारपर्यंत अमेरिकेत तब्बल 19 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या 89 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून मृत्यांचा आकडा वाढून 19 पर्यंत पोहोचला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एन्ड्रयू कुओमो यांनी सांगितले की, शनिवारी राज्यात 13 नवीन प्रकरणं समोर आली आहे. ज्यामुळे रुग्णांचा आकडा 89 पर्यंत पोहोचला आहे. यामुळे राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेनंतर भारतातही कोरोना व्हारसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळात पुन्हा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 39 झाली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या