Drug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप

Drug Racket: भारतात क्रिकेट दौऱ्यावर असताना इम्रान खान यांच्यावरही झाले होते ड्रग्ज घेतल्याचे आरोप

इम्रान खान ड्रग्ज घेतात, असा आरोप त्यांच्यावर पूर्वी क्रिकेटच्या सहकार्यानेच केला होता. त्यावर त्यांची दुसरी पत्नी रेहम यांनी ते नेहमी कोकेनचं सेवन करायचे असंही खळबळजनक विधान केलं होतं.

  • Share this:

संजय श्रीवास्तव

 नवी दिल्ली, 24 सप्टेंबर

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा (SSR) तपास करताना बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन उघडकीला आलं. NCB आता दीपिका पादुकोणचीही यासंदर्भात चौकशी करणार आहे. तसंच आज अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) आयपीएलमध्ये (IPL 2020) ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे दावा केला आहे. कोलकाता  नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) च्या मॅचनंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी वॉशरूममध्ये कोकिन घ्यायच्या. मला एनसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं, तर मी ही सविस्तर खुलासा करणार असल्याचंही शर्लिन म्हणाली. पण क्रिकेट आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन नवं नाही. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या इम्रान खानवर क्रिकेट दौऱ्यासाठी भारतात आलेले असतानाही ड्रग्ज घेतल्याचे आरोप झाले होते.

पत्नीचा खळबळजनक दावा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान 1987 साली पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे  कॅप्टन म्हणून  क्रिकेट मालिका खेळायला आले होते. त्या दौऱ्यात अनेक पार्ट्या झाल्या, त्या पार्ट्यांमध्ये त्यांनी ड्रगचं सेवन केल्याचा आरोप त्यांच्याच क्रिकेटच्या सहकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांची दुसरी पत्नी रेहम यांनी ते नेहमी कोकेनचं सेवन करायचे असंही धक्कादायक विधान केलं होतं.

अनेक वेळा झाले आरोप

इम्रान यांच्यावर ड्रग घेतल्याचे आरोप भरपूर वेळा करण्यात आले होते. त्यांची दुसरी पत्नी रेहम यांनी तर त्यांच्या पुस्तकात ते नेहमी रात्री कोकेन घेऊन झोपायचे, असे लिहिले आहे. 80 च्या दशकात जेव्हा इम्रान खान पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. त्यावेळी क्रिकेट दौऱ्याच्या पार्ट्यांमध्ये त्यांनी खूपदा ड्रगचं सेवन केलं होतं. त्यांच्या संघसहकाऱ्यांनी त्यांच्यावर  ड्रग घेतल्याचं सांगितलं त्यावेळी ही बातमी हवेसारखी सर्वत्र पसरली.

इम्रान खान पंतप्रधान होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर देखील हे असे आरोप त्यांच्यावर खूपदा करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ते फेटाळले होते.

इम्रानच्या सहकाऱ्यांनी केले त्यांच्यावर ड्रग घेतल्याचे आरोप

1987 साली पाकिस्तानची टीम क्रिकेटच्या सामन्यासाठी भारतात आली होती. त्यावेळी कासीम उमर पाकिस्तानच्या टीम मध्ये होते आणि इम्रान खान त्या टीमचे कॅप्टन होते. कासीम उमर  यांनी स्वतः इम्रान खान यांना ड्रग घेताना पाहिलं होतं. क्रिकेटच्या दौऱ्याच्यादरम्यान इम्रान खान यांनी दौऱ्याच्या पार्टीमध्ये मोठमोठ्या खेळाडूंसोबत ड्रग घेतले होते आणि त्यावेळी त्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रीदेखील हजर होत्या, असा दावा उमर यांनी केला आहे.

युनूस अहमद पण साक्षीदार

कासीम उमरने या घटनेचा खुलासा केला तेव्हा पाकिस्तानात धुमाकूळ माजला. थोड्याफार प्रमाणात चौकशी देखील झाली; पण हे प्रकरण तिथेच दाबून टाकण्यात आले. उमरनंतर अजून एका मोठ्या क्रिकेटरने ही बाब उचलून धरली. युनूस अहमद यांनी सांगितले की, ' भारताविरोधात जेव्हा दुसरा सामना कलकत्ता येथे खेळवण्यात आला होता,  त्यावेळी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ती पार्टी इम्रानच्या ओळखीच्या दोन सुंदर मुलींनी ठेवली होती.  ड्रग घेऊन ते मुलींसोबत नाचत होते.

इम्रान खान यांची दुसरी पत्नी रेहम खान यांनी स्वतःच्या 'रेहम खान'  नावाच्या  आत्मचरित्रात इम्रान खान ड्रग अॅडिक्ट असल्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की, "नेहमी रात्री 06 ग्राम कोकेन घेतल्यानंतरच ते झोपायचे. कधीकधी तर सिगारेटमध्ये चरस भरून ते नशा करायचे", असंदेखील त्यांनी लिहिले आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 24, 2020, 10:32 PM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या