VIDEO वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे नदीत कोसळलेल्या विमानातले सगळे प्रवासी असे बचावले

VIDEO वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे नदीत कोसळलेल्या विमानातले सगळे प्रवासी असे बचावले

हे बोइंग विमान फ्लोरिडा इथल्या विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होतं, तेव्हा वादळी वातावरण होतं. ढग आणि सोसाट्याच्या वाऱ्यातून कसंबसं विमान धावपट्टीवर उतरत असतानाच अपघात झाला.

  • Share this:

जॅक्सनव्हिल (फ्लोरिडा), 4 मे : अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या जॅक्सनव्हिल इथे बोइंग 737 विमान अपघातानंतर नदीत कोसळलं. विमानातले सर्वच्या सर्व 136 प्रवासी आश्चर्यकारकरीत्या वाचले आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. बचावकार्य सुरू आहे.

मायामी एअर इंटरनॅशनल या खासगी विमान सेवेचं हे बोइंग विमान जॅक्सनव्हिल इथल्या विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होतं, तेव्हा वादळी वातावरण होतं. ढग आणि सोसाट्याच्या वाऱ्यातून कसंबसं विमान धावपट्टीवर उतरलं, पण त्याच वेळी अपघातग्रस्त झालं. विमान धावपट्टीवर उतरत असताना घसरलं असा अंदाज आहे. हे विमान धावपट्टीपासून जवळच असलेल्या सेंट जॉन्स नदीत जाऊन पडलं.

जॅक्सनव्हिलचे मेयर लेनी करी यांनी या विमानातला एकही प्रवासी दगावला नसल्याची माहिती दिली आहे. त्यांनीच या अपघातग्रस्त विमानाचे फोटो शेअऱ केले आहेत. त्यात विमान पाण्यावर तरंगताना दिसत आहे.

वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप वाचले. काहींना किरकोळ इजा झाली आहे. विमान पूर्ण पाण्याखाली बुडालेलं नाही, तर तरंगत आहे. नेव्हीचं बचतकार्य सुरू असून, प्रवाशांना वाचवण्यात यश येत आहे, असं करी यांनी ट्वीट केलं आहे.

बोईंग विमानांच्या मागे लागलेलं अपघातांचं शुल्ककाष्ठ काही थांबताना दिसत नाही. फ्लोरिडामधील जॅक्सनव्हिलमधील घटना पुन्हा बोईंग 737 विमानाच्या बाबतीतच घडली आहे. अपघात झाल्यानंतर विमानातील इंधन नदीमध्ये मिसळू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्युबाहून येत असताना विमानाला हा अपघात झाला.

दरम्यान, यापूर्वी 10 मार्च रोजी इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 क्रॅश झालं होतं. यामध्ये 157 प्रवासी होते. अपघातादरम्यान सर्व म्हणजेच 157 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये भारतीय, अमेरिकन आणि चीनच्या प्रवाशांचा देखील समावेश होता. इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 आदिस आबाबा येथील केनियाची राजधानी नौरोबी येथे जात होतं. यावेळी विमान क्रॅश झालं. 149 प्रवासी आणि 8 क्रु मेंबर या विमानातून प्रवास करत होते. सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात झाला होता. त्यातील सर्व प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

बोईंग विमानांच्या वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता कंपनीनं देखील हे सारं प्रकरण गांभीर्यानं घेतलं होतं. दरम्यान, फ्लोरिडामधील अपघात नेमका कशामुळं झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.

First published: May 4, 2019, 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading