बॉडीबिल्डरनं केलं ‘सेक्स डॉल’ शी लग्न, आता पाहतोय तिची वाट!

बॉडीबिल्डरनं केलं ‘सेक्स डॉल’ शी लग्न, आता पाहतोय तिची वाट!

कझाकस्तानचा (Kazakhstan) बॉडी बिल्डर युरी तोलोचोको (Yuri Tolochko) सेक्स डॉलशी (Sex Doll) लग्न केल्यानं सध्या चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : कझाकस्तानचा (Kazakhstan) बॉडी बिल्डर युरी तोलोचोको (Yuri Tolochko) चं लग्न सध्या सोशल मीडियावर (Social Media) भरपूर चर्चेत आहे. एका खास कार्यक्रमात पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये त्यानं हे लग्न केलं. युरीनं कोणत्या महिलेशी, समलैंगिक पार्टरनशी किंवा तृतीय पंथीयाशी हे लग्न केलेलं नाही. तर त्यानं चक्क त्याच्या सेक्स डॉलशी (Sex Doll)  लग्न केलं आहे. या अनोख्या लग्नाची चर्चा ओसरण्याच्या आत युरीला तिच्या पार्टनरचा विरह सहन करत आहे.

लग्नात अडथळा

युरीची पार्टनर असलेल्या सेक्स डॉलचं नाव मार्गो (Margo) असून ती एक सिंथेटीक सेक्स डॉल आहे. त्याने मागच्या वर्षी या सेक्स डॉलसोबत रिलेशिनशिपमध्ये असल्याचं इन्स्टाग्रामवर (Instagram) जाहीर केलं होतं. त्यानंतर तो तिच्याबरोबर लगेच लग्न करणार होता. मात्र या वर्षातल्या अन्य कोणत्याही लग्नाप्रमाणे या लग्नातही Covid-19 चा अडथळा आला. या काळातील लॉकडाऊन तसंच लग्नावरील विविध निर्बंध यामुळे त्यानं हे लग्न पुढं ढकलले होते.

लग्नानंतर बदललं चित्र

युरीनं नोव्हेंबर महिन्यात त्याच्या लग्नाचं फुटेज सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले होते. त्या व्हिडीओमध्ये त्यानं परंपरागत नवऱ्याचा पोशाख घातला होता. लग्नानंतर त्यानं मार्गोसोबत नाच केला. आपल्या स्वप्नसुंदरीसोबतच्या आयुष्याची ही सुरुवात असून यानंतरही या प्रकारचं सेलिब्रेशन सुरु असेल असं युरीनं जाहीर केले होते.

मार्गोच्या फोटोवर अनेकांनी टीका केली. मात्र तिच्यामध्ये काहीही खोट नसल्याचा मार्गोचा दावा आहे. “काही जणांना ती आवडत नाही, त्या लोकांची मला पर्वा नाही. ती मंडळी आमच्यासारखी नाहीत. मार्गो बेस्ट लाईफ पार्टनर होईल असा माझा विश्वास आहे,’’ या शब्दात त्याने टीकाकारांना उत्तर दिले आहे.

मार्गोची प्लॅस्टिक सर्जरी देखील झाली आहे. “ती सध्या तुटली असून तिला दुरुस्तीसाठी दुसऱ्या शहरात पाठवण्यात आले आहे. मी सध्या मार्गोची वाट पाहत आहे,’’ असं युरीनं जाहीर केले आहे. कझाकस्तानमध्ये 7 जानेवारीला ख्रिसमस डे ( Christmas Day) सेलिब्रेशन आहे. त्यापूर्वी मार्गो जवळ असेल याबाबत युरी आशावादी आहे.

Published by: News18 Desk
First published: December 26, 2020, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या