म्यानमार विमान अपघातात 116 जणांना जलसमाधी?

म्यानमारमध्ये 116 प्रवाशांना घेऊन जाणा-या बेपत्ता लष्करी विमानाचे अवशेष अंदमानच्या समुद्रात आढळले आहेत.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2017 10:42 AM IST

म्यानमार विमान अपघातात 116 जणांना जलसमाधी?

08 जून : म्यानमारमध्ये 116 प्रवाशांना घेऊन जाणा-या बेपत्ता लष्करी विमानाचे अवशेष अंदमानच्या समुद्रात आढळले आहेत. या संदर्भात म्यानमार हवाईदलाने अधिकृतरित्या माहिती दिली आहे. या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

काल (बुधवारी) दुपारच्या सुमारास 116 प्रवाशांना घेऊन जाणारे लष्करी विमान बेपत्ता झालं होतं. याबाबत लष्कर कार्यालय आणि विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली होती. मान्यमारमधील दक्षिणेकडील मायईक आणि यंगून शहरातच्या परिसरात लष्करी विमान बेपत्ता झाल्याचं बोलल जात होते. या विमानात 105 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर होते. डवाई शहराच्या आसपास विमान पोहचल्यानंतर या विमानाच्या संपर्क तुटला. ही घटना दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानंतर नौदलाच्या नौका आणि हेलिकॉप्टरमार्फत या विमानाचा शोध घेण्यात येत होता.

दरम्यान, तांत्रिक कारणामुळे विमानाचा संपर्क तुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विमानांत १२ हून अधिक लहान मुलं होती, असंही सांगण्यात येत आहे. मात्र, आता दावेई शहरापासून 136 सागरी मैलावर या विमानाचे अवशेष सापडले. नौदलाकडून अजूनही विमानाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नौदलाच्या शोध आणि मदतकार्य पथकाला अवशेष मिळाल्याचे हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 10:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...