पाकिस्तानात मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात 22 ठार

पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू ओढवला तर 70 जण जखमी झाले. वायव्य सरहद्द प्रांतातल्या एका मशिदीमध्ये हा स्फोट झाला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2017 06:46 PM IST

पाकिस्तानात मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात 22 ठार

31 मार्च : पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू ओढवला तर 70 जण जखमी झाले. वायव्य सरहद्द प्रांतातल्या एका मशिदीमध्ये हा स्फोट झाला. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर झालेल्या या स्फोटात शियापंथियांना लक्ष्य करण्यात आलंय.

पारचिनार शहरात शियापंथियांची वस्ती असलेल्या भागातच हा स्फोट घडवण्यात आला. या मशिदीमध्ये शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी शियापंथीय जमले होते. मशिदीच्या महिलांसाठीच्या प्रवेशद्वाराजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने रुग्णायलयात दाखल करण्यात आलं.

हा स्फोट पाकिस्तानी तालिबान्यांनी घडवलाय. याआधी जानेवारी महिन्यात याच पाराचिनार शहरातल्या भाजी मंडईमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला होता. यात 20 जणांचा मृत्यू ओढवला. त्यानंतर याच शहरात हा स्फोट घडवून शियापंथियांना लक्ष्य करण्यात आलंय.

पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. पाकिस्तानातल्या दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी आमचं सरकार निकराचे प्रयत्न करतंय, असं त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...