इस्लामाबाद, 27 ऑक्टोबर : पाकिस्तानच्या पेशावरमधील (Peshawar Blast) मदरसामध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात सात लोक ठार झाले असून 70 हून अधिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ही मदरसा पेशावरमधील पेशावरच्या दिर कॉलनी जवळ असल्याचे सांगितले जाते. अद्याप स्फोटाचे कारण शोधले जात आहे. जखमींमध्ये बहुतांश मुलं असल्याचे सांगितली जात आहेत.
डॉन या पाकिस्तानी वृत्तसंस्थेशी बोलताना पेशावरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मन्सूर अमन म्हणाले की स्फोटाचे कारण अद्याप माहिती नाही आहे. प्राथमिक तपासणीत गॅस स्फोटाचे पुरावे मिळाले नाही आहेत. जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी सांगितले की 70 पेक्षा जास्त जखमींना येथे आणण्यात आले आहे, यात मुलांचा समावेश अधिक आहे, काही मुलांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.
Allah pak have mercy on us 🙏🏻 #Peshawar pic.twitter.com/w6brFsBH95
— SYEDA TUBA AAMIR (@TubaAtweets) October 27, 2020
पोलीस अधीक्षक मन्सूर यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या तपासणीत हा स्फोट आयईडी स्फोटाप्रमाणे दिसत आहे, जो सुमारे 5 किलो स्फोटकांचा वापर करुन करण्यात आला असावा. सध्या पोलीस संपूर्ण परिसरातून आणि मदरशामधून येणाऱ्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितले की जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा मदरशात मुलांसाठी कुराण वर्ग होता. मदरशामध्ये अज्ञात व्यक्तीने बॅग ठेवली. जखमींमध्ये अनेक मदरसा शिक्षकही आहेत.