काबूल 24 ऑक्टोबर: अफगाणिस्तान (Afghanistan)मध्ये स्फोटांची मालिका अजूनही थांबायचं नाव घेत नाही. शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये फुल-ई-खोस्क परिसरात स्फोट झाला आहे. या स्फोटात 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 31 लोकं जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रेनिंग सेंटरच्या गार्डने हल्लेखोराची माहिती दिली होती. पण हल्लेखोरापर्यंत पोहचण्याच्या आधीच तिथे स्फोट झाला. याआधी झालेल्या स्फोटामध्ये 9 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 2 पोलीस अधिकारी जखमी झाले होते.
सप्टेंबर महिन्यात काबूल आणि तालिबानमध्ये चर्चा सुरू झाली असूनसुद्धा अफगाणिस्तानामध्ये असे हिंसक स्फोट घडत आहेत. अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्याबद्दल एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे स्फोटांची मालिका संपण्याचं नाव घेत नाही. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडे असलेल्या नांगरहार प्रांतामध्ये सुरक्षा अभियानादरम्यान 33 तालिबानी दहशतवादी ठार झाले होते. तर 5 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. अफगाणिस्तानच्या सेनेने शनिवारी ही माहिती दिली. तालिबानी दहशतवाद्यांनी शेरजाद जिल्ह्यातील हशीम खेल प्रांतामध्ये अफगाणिस्तान सैन्याच्या चौकीवर हल्ला केला होता. त्यानंतर सुरक्षा बलानेही त्यांना चोख प्रत्त्युत्तर दिलं.
Interior Ministry says that the suicide bomber in today's explosion was recognized by security guards of a training center in the west of Kabul and detonated his explosives before reaching its target: Afghanistan's TOLOnews https://t.co/1gkItNG04z
अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी 16 दहशतवाद्यांचे मृतदेह हाती आले तसंच सात AK-47रायफल्स आणि एक ग्रेनेड लाँचरही जप्त करण्यात आलं आहे. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये शांतता नांदावी यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची चर्चा सुरू आहे. पण असं असलं तरीही अफगाणिस्तानमध्ये होणारे हल्ले थांबवण्याचं नाव घेत नाहीत