News18 Lokmat

झूमधल्या 'बघिरा'बरोबर 'ती' सेल्फी घ्यायला गेली आणि...

या काळ्या चित्त्याचा फोटोच थरकाप उडवणारा आहे. पण याच चित्त्यामुळे महिलेला संकटाचा सामना करावा लागला.

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 02:46 PM IST

झूमधल्या 'बघिरा'बरोबर 'ती' सेल्फी घ्यायला गेली आणि...

मुंबई, 11 मार्च : या काळ्या चित्त्याचा फोटोच थरकाप उडवणारा आहे. पण याच चित्त्यामुळे महिलेला संकटाचा सामना करावा लागला. अमेरिकेतल्या एरिझोना राज्यातली 30 वर्षाच्या जवळपास असलेल्या स्त्रीवर या काळ्या चित्त्यानं हल्ला केला. अर्थात याला कारणीभूत झाली ती महिलाच. ती या चित्त्याच्या अगदी जवळ पोचली. का, तर तिला सेल्फी काढायचा होता.

वर्ल्डलाइफ वर्ल्ड झूजवळ गेल्या वीकेण्डला प्राणीसंग्रहालयात काही जणांनी भेट दिली. त्यातल्या एका उत्साही स्त्रीनं या काळ्या चित्त्याच्या जवळ जाण्यासाठी एका पिंजऱ्याच्या बाजूला उडी मारली. मोबाईलवर काळ्या चित्त्याबरोबर  सेल्फी काढण्यासाठी तिनं प्रयत्न केला. आधीच लाजाळू असलेला हा प्राणी या प्रकारानं वैतागला. आणि त्या महिलेला पंजा मारून तो निघून गेला. त्यानंतर महिलेला मदत करायला सगळे धावले.

या स्त्रीचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केलाय. त्यानंतर तो काळा चित्ता पाण्याच्या हौदाजवळ आहे. तो समाधानानं पाणी पितोय.Loading...

प्राणी संग्रहालयानं एक पत्रक काढून म्हटलंय, प्राणी आणि माणसांच्या मध्ये म्हणून सुरक्षेसाठी बॅरिगेट्स ठेवले असतात. यापुढे हा चित्ता कोणावर हल्ला करणार नाही, असंही या प्राणी संग्रहालयानं सांगितलंय.त्या अति उत्साही महिलेनं प्राणी संग्रहालयाची क्षमा मागितलीय.


VIDEO: याला नेमकं म्हणावं तरी काय, बस स्टॉप की एअरपोर्ट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...