लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

स्वित्झर्लंड मधील बँकांमधील भारतीयांच्या खात्यांची माहिती भारताला आपोआप, तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कराराला स्वित्झर्लंडच्या संसदेच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली आहे

  • Share this:

20 नोव्हेंबर: स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण कायदा स्वित्झर्लंड सरकारने पारित केला आहे.

स्वित्झर्लंड मधील बँकांमधील भारतीयांच्या खात्यांची माहिती भारताला आपोआप, तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कराराला स्वित्झर्लंडच्या संसदेच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली आहे. स्वित्झर्लंडच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील ‘कमिशन फॉर इकॉनॉमिक अफेअर्स अँड टॅक्सेस’ या समितीने या कराराला नुकतीच मंजुरी दिली आहे. भारतासह अन्य ४० देशांबाबतचा हा करार करण्यात आला आहे.

मात्र त्याच वेळी, वैयक्तिक प्रकरणांमध्ये माहितीचे देताना कायदेशीर दाव्यांचे उल्लंघन होऊ नये, यादृष्टीने आवश्यक तरतुदी करण्याचे निर्देश या समितीने स्वित्झर्लंड सरकारला दिले आहेत. समितीच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव स्विस संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मांडण्यात येईल. २७ नोव्हेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. वरिष्ठ सभागृहाच्या मंजुरीनंतर अधिवेशनात माहितीची आपोआप देवाणघेवाण करण्याचा करार प्रत्यक्षात येईल.

स्विस संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने सप्टेंबरमध्येच या प्रस्तावास मान्यता दिली होती.त्यामुळे आतातरी काळ्या पैशाचा शोध लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 20, 2017, 9:22 AM IST

ताज्या बातम्या