S M L

'व्हॅटिकन सिटी'त सुरू होणार 'जादूटोण्या'चे वर्ग!

ख्रिश्चन समुदायाचं सर्वोच्च स्थान असणाऱ्या व्हॅटिकन सिटीत आता चक्क जादूटोणा आणि ब्लॅकमॅजिक संदर्भातले वर्ग सुरू होणार आहे. असे वर्ग सुरू करण्यासाठी जगभरातल्या कॅथेलिक समुदायाकडून मोठी मागणी होती. त्यामुळं हा कोर्स सुरू होणार आहे.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 17, 2018 10:05 PM IST

'व्हॅटिकन सिटी'त सुरू होणार 'जादूटोण्या'चे वर्ग!

रोम,ता.17 एप्रिल: ख्रिश्चन समुदायाचं सर्वोच्च स्थान असणाऱ्या व्हॅटिकन सिटीत आता चक्क जादूटोणा आणि ब्लॅकमॅजिक संदर्भातले वर्ग सुरू होणार आहे. असे वर्ग सुरू करण्यासाठी जगभरातल्या कॅथेलिक समुदायाकडून मोठी मागणी होती. त्यामुळं व्हॅटिकने हा निर्णय घेतल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे.

वर्षभर हा कोर्स चालणार असून प्रत्येक बॅचला आढवडाभराचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. असून 50 देशांमधले 250 पाद्री या वर्गात सहभागी होणार आहेत. 'एंटायटल्ड एक्सॉर्सिझम अँड द प्रेअर ऑफ लिबरेशन' असं या कोर्सचं नाव असून तो आठवडाभर चालणार आहे. 24 हजार एवढी त्याची फी आहे.

भूत, प्रेत, अघोरी शक्तींची ओळख आणि अस्वस्थ, अशांत आत्म्यांना शांत करण्याच्या विधी या कोर्समध्ये शिकवण्यात येणार आहेत. जादूटोण्याचे धार्मिक विधी, त्याचा मनावर होणारा परिणाम आणि अघोरी विद्येचं शास्त्र त्यासाठीच्या प्रार्थना याबाबतही या कोर्समध्ये शिकवण्यात येणार आहे.

जगभरातल्या अनेक देशांमध्ये जादू टोणा झाल्याच्या तक्रारी घेऊन लोक चर्चेसमध्ये येतात असं अनेक चर्चेसच्या फादर्सनी सांगितलं आहे. इटलीत दरवर्षी 5 लाख लोक अशा प्रकारच्या विद्येचा उपयोग करतात. तर ब्रिटनमध्येही असे प्रकार वाढत असल्याचं काही अभ्यास संस्थांनी म्हटलं आहे. तर या प्रकारामुळं अंधश्रद्धांना बळ मिळते अशी टीका अनेक सुधारणावादी संघटनांनी केलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 10:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close