Home /News /videsh /

मार्केटमध्ये विकला जातोय जळालेला पाव; अनेकांना आवडतोय हा स्वाद

मार्केटमध्ये विकला जातोय जळालेला पाव; अनेकांना आवडतोय हा स्वाद

अनेकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कोणाला कधी काय पसंत पडेल हे सांगता येत नाही. स्कॉटलंडमध्येही सध्या नेमकी हीच गोष्ट अनुभवायला मिळते आहे.

    नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : इतर अनेक गोष्टींप्रमाणे जेवणाची अभिरुचीही सध्या बदलली आहे. देश-विदेशातले पदार्थ करणं कोणालाही सहज शक्य झालं आहे. तसंच पदार्थ तयार करण्याच्या पद्धतींमध्येही वैविध्य आलं आहे. बार्बेक्यू पद्धतीच्या चवीला ग्राहकांची सध्या पसंती मिळते आहे. आपल्याकडे बार्बेक्यू किंवा भाजलेल्या, करपट (Burnt Flavor) चवीचे अनेक पदार्थ मिळू लागलेत. अर्थात सरसकट कोणत्याही पदार्थाला बार्बेक्यूची चव भारतीय खाद्यसंस्कृतीला अजूनही मानवलेली नाही. एकीकडे भारतीय लोकांची ही आवड आहे, तर स्कॉटलंडमध्ये (Scotland) मात्र जळलेला/करपलेला ब्रेडही अगदी सहज विकला जातोय. स्कॉटलंडमधल्या ग्रेट मॅन्चेस्टरमध्ये वरून जळलेले काळपट ब्रेड विकले जात आहेत. असे काळे ब्रेड खरं तर कोणालाच खायला आवडत नाहीत; पण काही जणांना मात्र कुरकुरीत व जळक्या स्वादाचे हे ब्रेड आवडत आहेत. स्कॉटलंडच्या ऑथेंटिक चवीमध्ये (One Of The Authentic Taste) जास्त प्रमाणात भाजलेल्या या ब्रेडचा समावेश होतो. हे ब्रेड दिसायला अगदीच काळपट असतात. सोशल मीडियावर सध्या या ब्रेडचे फोटो पाहायला मिळताहेत. स्कॉटलंडमध्ये सध्या अनेकांना या ‘वेल फायर्ड ब्रेड’चा (Well Fired Bread) स्वाद आवडतो आहे. हा वरून कुरकुरीत असतो; पण आतून एकदम सॉफ्ट असतो. तो वेल फायर्ड ब्रेड या नावानं ओळखला जातो. ग्रेट मॅन्चेस्टरच्या Hyde Indoor Market मध्ये हा खास ब्रेड मिळतो. मॅन्चेस्टरच्या फेसबुक ग्रुप्सवर या ब्रेडचे फोटो शेअर केले जात आहेत. यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही येताहेत. काहींनी तर चक्क याला 'क्रिमेटेड रोल' असंही म्हटलंय. ज्यांनी अजूनही या ब्रेडचा स्वाद चाखलेला नाही, त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं सांगितलं, की 'माझ्या आईच्या मते हा ब्रेड भाजलेला नाही, तर जळलेला आहे.' काही युझर्सनी मात्र ब्रेडची चव आवडल्याचं सांगितलं आहे. अशा पद्धतीचा जळका ब्रेड खावा की खाऊ नये यावरूनही अनेकांमध्ये संभ्रम आह. स्कॉटलंडच्या फूड स्टँडर्ड एजन्सीने 2018मध्ये लोकांना असं आवाहन केलं होतं, की असे जळके ब्रेड कमी प्रमाणात खावेत. Cancer Research UK Acrylamide या संस्थेच्या म्हणण्यानुसार, जळलेला ब्रेड, टोस्ट, बटाटे किंवा चिप्स खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका नसला, तरी आरोग्यासाठी ते पदार्थ फारसे चांगले नसतात. असे पदार्थ हेल्दी फूडच्या यादीत बसत नाहीत. अनेकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कोणाला कधी काय पसंत पडेल हे सांगता येत नाही. स्कॉटलंडमध्येही सध्या नेमकी हीच गोष्ट अनुभवायला मिळते आहे.

    First published:

    Tags: Social media

    पुढील बातम्या