मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पार्कमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या कपलवर अस्वलाचा हल्ला; पाळीव कुत्र्यानं वाचवला जीव, पण...

पार्कमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या कपलवर अस्वलाचा हल्ला; पाळीव कुत्र्यानं वाचवला जीव, पण...

इथलं एक कपल आपल्या कुत्र्याला सोबत घेऊन पार्कमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं. अचानक तिथे एक काळं अस्वल आलं.

इथलं एक कपल आपल्या कुत्र्याला सोबत घेऊन पार्कमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं. अचानक तिथे एक काळं अस्वल आलं.

इथलं एक कपल आपल्या कुत्र्याला सोबत घेऊन पार्कमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं. अचानक तिथे एक काळं अस्वल आलं.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : रिकाम्या वेळेत आपल्या जवळच्या माणसांसोबत फिरायल जवळपास सर्वांनाच आवडतं. घरात बसून बसून कंटाळा आला की बहुतेकदा लोक पार्कमध्ये किंवा बाहेर कुठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अमेरिकेतील (America) एक कपलही रिकाम्या वेळेत पार्कमध्ये फिरण्यासाठी गेलं. मात्र, इथेच एका अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला (Black Bear Attack on Couple). यानंतर भीतीनं त्यांची अवस्था वाईट झाली. यानंतर आपला जीव वाचवून हे कपल तिथून पळून गेलं. ही घटना अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलाईना (North Carolina) येथील आहे. इथलं एक कपल आपल्या कुत्र्याला सोबत घेऊन एशविलेच्या ब्लू रिज पार्कवे मध्ये फिरण्यासाठी गेलं होतं. अचानक तिथे एक काळं अस्वल आलं. सध्याचा काळ हा अस्वलांच्या हिवाळी हायबरनेशनचा हाइबरनेशन (Winter Hibernation)आहे, त्यामुळे अशा काळात अस्वलाला पार्कमध्ये पाहून कर्मचारीही हैराण झाला. घराच्या भिंतीत युवकाला आढळलं असं काही की पाहूनच उडाला थरकाप, समोर आलं सत्य डेली स्टारच्या वृत्तानुसार, पार्कमध्ये आपली पाळीव प्राणी घेऊन येणाऱ्या लोकांनी त्यांना दोरीनं बांधणं अनिवार्य आहे. मात्र, अस्वल समोर दिसताच या कपलनं दोरी सोडली. यानंतर कुत्रा अस्वलाकडे धाव घेऊ लागला आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करू लागला. अस्वल कपलच्या अतिशय जवळ आलं होतं आणि ते फार हिंसक दिसत होतं. त्यानं आपल्या पंजानं कपलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्यानं त्याला असं करू दिलं नाही. अस्वल मोठमोठ्यानं ओरडत होतं आणि रागात हल्ला (Bear Attack on Couple) करण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र, हे कपल लगेचच आपल्या कुत्र्याला घेऊन कारमध्ये बसलं आणि दरवाजे लावून घेतले. अस्वलाच्या या हल्ल्यात कपलला थोडीफार दुखापत झाली आहे. यामुळे ते पार्कमधून थेट रुग्णालयात गेले. पार्कचे कर्मचारीही या घटनेमुळे हैराण झाले. सध्या या अस्वलाचा शोध घेतला जात आहे. हे अस्वल सापडताच त्याला मारून टाकण्यात येईल. फक्त प्रौढच घेऊ शकतात या खास आईस्क्रीमचा आस्वाद; अजब आहे यामागचं कारण साल 2018 मध्ये एका अस्वलानं पार्कमध्ये महिलेवर हल्ला केला होता. तेव्हापासूनच नॉर्थ कॅरोलाइना वाइल्डलाइफ रिसोर्स कमिशननं असा नियम बनवला की अस्वलानं माणसावर हल्ला केल्यास त्याला यूथेनाइज केलं पाहिजे. कमिशनचं असं म्हणणं आहे, की काळी अस्वलं शक्यतो हल्ला करत नाही. मात्र, जर ते हल्ला करायला शिकले तर वारंवार करतात आणि आपल्या पिल्लांनाही हल्ला करायला शिकवतात.
First published:

Tags: Attack, Wild animal

पुढील बातम्या