मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिकेतील असा समुदाय जिथे प्रत्येक पुरुषाला आहेत किमान 3 बायका, कारण तर ऐका!

अमेरिकेतील असा समुदाय जिथे प्रत्येक पुरुषाला आहेत किमान 3 बायका, कारण तर ऐका!

Bizarre Commune In America : अमेरिकेच्या युटा राज्यात डोंगराळ भागात असा एक समुदाय राहतो, ज्यामध्ये लोकं अमेरिकेतून स्थायिक झाले आहेत. या समुदायाची खास गोष्ट म्हणजे इथे एका पुरुषाच्या किमान 3 बायका असतात. पण प्रत्येकजण आनंदी आहे.

Bizarre Commune In America : अमेरिकेच्या युटा राज्यात डोंगराळ भागात असा एक समुदाय राहतो, ज्यामध्ये लोकं अमेरिकेतून स्थायिक झाले आहेत. या समुदायाची खास गोष्ट म्हणजे इथे एका पुरुषाच्या किमान 3 बायका असतात. पण प्रत्येकजण आनंदी आहे.

Bizarre Commune In America : अमेरिकेच्या युटा राज्यात डोंगराळ भागात असा एक समुदाय राहतो, ज्यामध्ये लोकं अमेरिकेतून स्थायिक झाले आहेत. या समुदायाची खास गोष्ट म्हणजे इथे एका पुरुषाच्या किमान 3 बायका असतात. पण प्रत्येकजण आनंदी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

युटा, 24 डिसेंबर : अनेक देशांमध्ये आता एक पत्नी असल्यावर दुसरा विवाह करता येत नाही. मात्र, अमेरीकेत एक गाव असं आहे, जिथं एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मान्यता आहे. एकापेक्षा जास्त विवाह केल्यास आपल्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले जातील, अशी या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची धारणा आहे. काय आहे हा प्रकार? चला जाणून घेऊया.

युटा (Utah) हे पश्चिम युनायटेड स्टेट्समधील एक राज्य आहे. हे राज्य अनेक अर्थांनी विशेष आहे. येथे असलेल्या सर्व टेकड्यांमध्ये अशी एक टेकडी आहे जिथे 100 पेक्षा जास्त लोकांचे वास्तव्य आहे. हे लोक आदिवासी किंवा स्थलांतरित नाहीत. मात्र, तरीही एका विशेष विश्वासामुळे त्यांनी स्वतःचा वेगळा समुदाय (Bizarre commune) बनवला आहे. हे सर्व लोक कट्टरतावादी मॉर्मन्सवर (fundamentalist Mormons) विश्वास ठेवतात जिथे प्रत्येक पुरुषाला एकापेक्षा जास्त बायका असतात. या खडकाच्या आत सुमारे 15 कुटुंबे राहतात ज्यांचा असा विश्वास आहे की एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास मृत्यूनंतर स्वर्गाचे दरवाजे उघडतात. या खडकांना रॉकलँड रँच (Rockland Ranch) म्हटले जाते. चला सविस्तर जाणून घेऊ.

हा समुदाय कधी निर्माण झाला?

रॉकलँड रँच हे इतर खडकासारखे दिसत असले तरी हे निवासी क्षेत्र आहे. येथे राहणारे मॉर्मन लोक 1970 च्या दशकात येथे आले. हा पंथ बॉब फॉस्टरने सुरू केला होता. फॉस्टर एक शिक्षक होता ज्यांना 3 बायका आणि 38 मुले होती. बॉब फॉस्टरला बहुपत्नीत्वासाठी तुरुंगवास भोगावा लागला. जेव्हा तो तुरुंगातून सुटला तेव्हा त्याने स्वतःचा समुदाय तयार केला, तो आपल्या बायकांसह रॉकलँड रँचमध्ये रहायला गेला. त्याच्या विचाराशी सहमत असलेले काही ख्रिश्चन कट्टरपंथी देखील त्याच्यासोबत रॉकलँड रँचमध्ये राहू लागले. हळूहळू ते एक मोठे कुटुंब बनले. असे मानले जाते की अजूनही तेथे राहणारे बरेच लोक बॉब फॉस्टरची मुले आहेत.

ही जागा कशी आहे?

रॉकलँड रँचला अनेक ठिकाणी डायनामाईटने उडवून टाकले असून त्यामुळे मोठ्या गुहा तयार झाल्या आहेत. या गुहांमध्ये लोक घरे बांधून राहतात आणि जसजसे कुटुंब वाढत जाते तसतशी घरांची संख्याही वाढत जाते. सुरुवातीच्या टप्प्यात येथे एकच जनरेटर होते आणि शौचालयाची सोय देखील नव्हती. आता हा मॉर्मन समुदाय स्वावलंबी झाला आहे. त्याचे स्वतःचे शेत, सौरऊर्जेचे स्त्रोत, पोल्ट्री फार्म तसेच महामार्गाला जोडणारा रस्ता आहे.

मग तुम्ही असे एकांतात का जगता?

अमेरिकेत बहुपत्नीत्वाला मान्यता नाही. यामुळे बॉब फॉस्टर यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहाशिवाय या समाजाने स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले आहे.

येथील लोकं कशी आहेत?

टेलिग्राफमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार येथील लोक शांतताप्रिय आहेत. पुरुषाच्या सर्व बायका आपापसात प्रेमाने राहतात. बहुपत्नीत्वाची प्रथा त्यांच्यावर कोणी लादलेली नाही, तर ती त्यांची स्वतःची मर्जी आहे. मरिना मॉरिसनला अजूनही तिच्या पतीला त्याच्या इतर दोन पत्नींसोबत पाहण्याची सवय नाही. ही मत्सराची भावना मनातून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ती सांगते. तिच्या शिवाय तिच्या पतीला आणखी 2 बायका आहेत, त्यापैकी एक त्यांच्या घरी तिच्यासोबत राहते, तर दुसरीचे घर शेजारी आहे.

मुलेही करतात शेतात काम

इथली सभ्यता हिप्पींची आहे. इथे शाळेत जाण्याबरोबरच मुलं त्यांच्या शेतात आणि पोल्ट्री फार्ममध्येही काम करतात. कुटुंबातील सदस्यांसोबत एकोप्याने राहणे ही येथील पुरुषांची जबाबदारी आहे. येथे अशी काही कुटुंबे आहेत जी बहुपत्नीत्व पाळत नाहीत, पण तरीही स्वत:ला या समाजाचा भाग मानतात.

First published:

Tags: America