Home /News /videsh /

Bilquis Bano Edhi यांच्या निधनानंतर संपूर्ण पाकिस्तान शोकाकुल, भारताशी आहे खास कनेक्शन

Bilquis Bano Edhi यांच्या निधनानंतर संपूर्ण पाकिस्तान शोकाकुल, भारताशी आहे खास कनेक्शन

'द मदर ऑफ पाकिस्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बिलकिस बानो इधी (Bilquis Bano Edhi) यांचं शुक्रवारी (15 एप्रिल 22) निधन झालं. कराचीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

नवी दिल्ली, 16 एप्रिल: 'द मदर ऑफ पाकिस्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बिलकिस बानो इधी (Bilquis Bano Edhi) यांचं शुक्रवारी (15 एप्रिल 22) निधन झालं. कराचीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या व्यवसायाने नर्स होत्या आणि त्याचबरोबर त्यांचे पती दिवंगत समाजसेवक अब्दुल सत्तार इधी (Abdul Sattar Edhi) यांच्यासोबत इधी फाउंडेशनचे (Edhi Foundation) काम देखील पाहत होत्या. भारतीय दूतावासानेही बिलकिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिलकिस बानो एक दानशूर आणि मानवतावादी समाजसेविका होत्या. ‘द मदर ऑफ पाकिस्तान’ (The Mother of Pakistan) अशी ओळख असलेल्या बिलकिस बानो यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे. त्या 74 वर्षांच्या होत्या. डॉन या वृत्तपत्रानुसार बिलकिस बानो यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा फैसल इधी यांनी दिली. बिलकिस बानो या अनेक आजारांनी त्रस्त होत्या आणि त्यांना हृदयविकार आणि फुफ्फुसांचा देखील त्रास होता. काही दिवसांपूर्वी बिलकिस बानो यांचा रक्तदाब अचानक कमी झाला. त्यानंतर त्यांना कराची येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर शुक्रवारी (15 एप्रिल 22) त्यांचं दुःखद निधन झालं. व्यवसायाने नर्स असलेल्या बिलकिस बानो यांनी आपल्या आयुष्यातील सहा दशकांहून अधिक काळ गरजूंची सेवा करण्यात घालवला आहे. तसेच त्यांनी हजारो अनाथ मुलांना पाकिस्तानमधील एधी होम्स आणि केंद्रांमध्ये पोहोचवून त्यांची विपरित परिस्थितीतून सुटका केली. हे वाचा- 'गोलमाल'ची 'रत्ना' काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन भारतीय दूतावासाने केला शोक व्यक्त पाकिस्तानातील भारतीय दूतावासाने आज कराचीत बिलकिस बानो इधी यांचं निधन झाल्याबद्दल ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. "बिलकिस इधी यांच्या निधनाबद्दल भारतीय दूतावास दु:ख व्यक्त करत आहे. हर्स आणि इधी फाउंडेशनने केलेली मानवजातीची सेवा ही जगभर वाखाणली गेली आहे." असं दूतावासाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. बिलकिस बानो यांचं भारताशी होतं खास कनेक्शन बिलकिस बानो यांचे भारताशीदेखील जुने संबंध होते. बिलकिस बानो यांचे पती म्हणजेच इधी फाऊंडेशनचे संस्थापक अब्दुल सत्तार इधी यांनी गीता या अपंग भारतीय मुलीला दत्तक घेतलं होतं. गीता अवघ्या सात वर्षांची असताना समझौता एक्स्प्रेसमध्ये एकटी बसलेली लाहोर रेल्वे स्थानकावर पाकिस्तान रेंजर्सना आढळली होती. 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने गीताला पाकिस्तानातून भारतात आणण्यात आलं होतं. हे वाचा- विधानसभेत गदारोळ; नेत्यांनी उपसभापतींच्या लगावली कानशिलात, केसही ओढले बिलकिस यांना मिळाले आहेत अनेक पुरस्कार बिलकिस बानो इधी यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये त्यांना सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा मेमोरियल इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांना 1986 साली सार्वजनिक सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कारदेखील देण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना आपल्या पतीसह मिळाला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह इतरांनीही बिलकिस बानो इधी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
First published:

पुढील बातम्या