मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचं बिल गेट्सकडून कौतूक

मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचं बिल गेट्सकडून कौतूक

स्वच्छ भारत अभियानात 2019 पर्यंत भारत मोठी झेप घेईलअसंही गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

  • Share this:

27 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `स्वच्छ भारत अभियानाचं बिल आणि मिलींडा गेट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी कौतुक केलंय. स्वच्छ भारत अभियानात 2019 पर्यंत भारत मोठी झेप घेईलअसंही गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

नरेंद्र मोदींचं पंतप्रधान झाल्यानंतरचं लाल किल्ल्यावरचं हे पहिलं भाषण...या भाषणात त्यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली आणि देशवासियांनी स्वच्छतेचा आग्रह धरावा असं आवाहन केलं.

पंतप्रधानांच्या या उपक्रमाचं आणि गेल्या अडीच वर्षात झालेल्या कामाचं बिल गेट्स यांनी ब्लॉग लिहून कौतुक केलंय. जगातल्या कुठल्याही राष्ट्रप्रमुखानं अशा प्रकारचा विषय आपल्या भाषणात घेणं हे धाडसाचं आहे असं बिल गेट्स यांनी म्हटलंय. गेट्स यांनी फक्त ब्लॉगच लिहिला नाही तर भारतात सुरू असलेल्या कामांवर एक व्हिडिओही तयार केलाय.

मायक्रोसॉफ्टमधून निवृत्त झाल्यानंतर बिल आणि त्यांच्या पत्नी मिलींडा गेट्स हे गेट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जगभर सामाजिक कार्य करत असतात. त्यामुळेच गेट्स यांना पंतप्रधानांचा स्वच्छतेचा मुद्दा चांगलाच भावला. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर काही महिन्यांमध्ये साडेसात लाख टॉयलेट्स बांधण्यात आलेत ही खूप मोठी गोष्ट आहे असंही त्यांनी म्हटलंय.

दरवर्षी अस्वच्छतेमुळे जगभरात 17 लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातही गरीबांना याचा मोठा फटका बसतो. 2014 मध्ये भारतात सॅनिटेशनचं प्रमाण हे 42 टक्के होतं ते 63 टक्के झालंय.

2 ऑक्टोबर 2019 मध्ये महात्मा गांधींची 150 वी जयंती आहे. त्यावेळी सर्व भारत स्वच्छ व्हावा असं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघितलंय. याच वेगानं आणि जोमानं काम झालं तर भारत स्वच्छ होईल. लोकांना हेच परिवर्तन हवं आहे. हे  काम झालं तर ते दुसऱ्या देशांनाही एक आदर्श उदाहरण असेल असंही गेट्स यांनी आपल्या ब्लॉग मध्ये सांगत स्वच्छ भारत अभियानाचं कौतुक केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 06:12 PM IST

ताज्या बातम्या