इस्लामाबाद 29 जून: कोरोनाचं संकट आणि कराचित झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Pm Imran Khan) सध्या अडचणीत सापडले आहेत. मुख्य विरोधीपक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पक्षाचे नेते बिलावल भुट्टो(PPP Leader Bilawal Bhutto ) यांनी आज इम्रान खान यांच्यावर सर्वात मोठा हल्ला बोल केलाय. इम्रान खान हे सर्वात डरपोक पंतप्रधान असून त्यांनी पाकिस्तानला खड्ड्यात घातलं आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत बोलताना त्यांनी तुफान फटकेबाजी करत इम्रान खान यांचे वाभाडे काढले. खान यांनी देशाला खड्ड्यात घालण्याऐवजी स्वत: क्वारंटाइन व्हावं असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.
बिलावल भुट्टो पुढे म्हणाले, दहशतवाद्यांविरुद्ध लढतांना शहीद झालेल्या बेनझीर भुट्टो यांना इम्रान खान शहीद म्हणत नाहीत. मात्र ओसामा बिन लादेनला ते शहीद असं म्हणतात. खान यांनी देशाची मान खाली घातली आहे असा आरोपही त्यांनी केला.
“عمران خان شہید محترمہ بینظیر بھٹو کو شہید نہیں کہتے مگر ایک دہشت گرد ان کے نزدیک شہید ہے۔”
چیئرمین پاکستان پیپلز پارٹی بلاول بھٹو زرداری @BBhuttoZardari 3/3 pic.twitter.com/XdsKBEGsZ6 — PPP (@MediaCellPPP) June 29, 2020
काय म्हणाले होते इम्रान खान?
दहशतवाद निर्मूलनाबाबत पाकिस्तानचा दृष्टिकोन काय आहे, हे पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. जगभरात भयावह दहशतवादी हल्ले करणार्या अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'शहीद' म्हणून संबोधले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्या अटकेसाठी ‘या’ देशाने काढलं अटक वॉरंट
आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरूद्ध कोणतेही पाऊल उचलले नाही आणि दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा त्याच्यावर आधीच आरोप आहे, असे वक्तव्य खान यांनी केले आहे. खान म्हणाले की, अमेरिकेच्या दहशतवादाविरूद्ध युद्धात पाकिस्तानने आपले 70 हजार लोक गमावले.
'सर मेरे सामने गोलियाँ चल रहीं है!' हल्ल्याचा LIVE VIDEO
या घटनेमुळे जे लोक पाकिस्तानच्या बाहेर होते त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे खान म्हणाले. 2010 नंतर पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले झाले आणि तेथील सरकारने केवळ त्याचा निषेध केला. ते म्हणाले की, अमेरिकेच्या अॅडमिरल मालन यांना पाकिस्तानवर ड्रोन हल्ले का केले जात आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, सरकारच्या परवानगीने ही कारवाई केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bilawal bhutto, Imran khan