मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

प्रसिद्ध नेत्याच्या सेक्स स्कँडलचा धक्कादायक खुलासा; पैशांच्या मोबदल्यात 15 महिलांशी ठेवले संबंध

प्रसिद्ध नेत्याच्या सेक्स स्कँडलचा धक्कादायक खुलासा; पैशांच्या मोबदल्यात 15 महिलांशी ठेवले संबंध

स्पा सेंटरचा मालक अटकेत आहे. राजस्थान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

स्पा सेंटरचा मालक अटकेत आहे. राजस्थान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Matt Gaetz Paid Escort एका दाव्यानुसार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी संतापलेल्या गेट्ज यांनी ड्रग्जचे सेवन करून एका महिलेशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर या महिलेला कराच्या पैशातून 15 हजार डॉलर दिले.

  • Published by:  News18 Desk

वॉशिंग्टन, 15 मे : अमेरिकेमध्ये (USA) पुन्हा एकदा एका बड्या नेत्याशी संबंधित सेक्स स्कँडलचा (Sex Scandle) खुलासा झाला आहे. अमेरिकन काँग्रेसचे (US Congress) नेते मॅट गेट्ज (Matt Gaetz) यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यांनी पैसे देऊन 15 महिलांशी संबंध ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. गेट्ज हे ट्रम्प सरकारमध्ये (Trump Government) अत्यंत प्रभावी नेत्यांपैकी एक होते.

द डेली बीस्टने दिलेल्या वृत्तानुसार फ्लोरीडाचे माजी टॅक्स कलेक्टर राहिलेल्या गेट्ज यांच्यावर सुमारे 15 महिलांबरोबर पैशाच्या मोबदल्यात सेक्स केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा खळबळजनक आरोप महिला एस्कॉर्ट आणि इन्स्टाग्रामवरी मॉडेल जालोन्का हिनं केला आहे. 2019 मध्ये ऑरलँडोमध्ये गाला सोहळ्यामध्ये ती गेट्ज यांना भेटली होती.

(वाचा-घाईगडबडीत हे 5 बनावट CoWin वॅक्सिन अ‍ॅप डाउनलोड करू नका, सरकारचा इशारा)

या प्रकरणात विविध दावे केले जात आहे. त्यापैकी एका दाव्यानुसार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी संतापलेल्या गेट्ज यांनी ड्रग्जचे सेवन करून एका महिलेशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर या महिलेला कराच्या पैशातून 15 हजार डॉलर दिले. या महिलेला फ्लोरीडामध्ये सोशल मीडियासाठी नोकरीवरही ठेवलं होतं. पण तिनं कधीही काहीही काम केलं नसल्याचं समोर आलं आहे.

द डेली बीस्टच्या रिपोर्टनुसार गाला सोहळ्यानंतर एका खोलीमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जालोन्का आणि गेट्ज यांनी कोकीनचं सेवन केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार वेबसाईटने दावा केला आहे की, जालोन्का आणि गेट्ज यांच्यामध्ये शारीरिक संबंधांच्या मोबदल्या आर्थिक व्यवहार सुरू होते. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

(वाचा-नवरीच्या घरात सुरू होती लग्नाची धावपळ; 2 नवरदेवांच्या वराती पाहून वऱ्हाडी शॉक)

रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, 2017 मध्ये जालोन्काचे ग्रीनबर्गशी असलेले संबंध वापरून गेट्जसाठी मुलींना राजी करण्यात येत होतं. ग्रीनबर्ग आणि गेट्ज मित्र होते. जोएल ग्रीनबर्ग यांना लैंगिक अपराध आणि धोकेबाजीच्या आरोपांमध्ये न्यायालयात सादर केलं जाणार आहे. या दरम्यान कोर्टात गेट्ज यांच्यावरही याबाबत आरोप केले जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: United States of America, USA