मोठी बातमी! भारतानंतर आता 'या' देशातही TikTok बंद होणार

मोठी बातमी! भारतानंतर आता 'या' देशातही TikTok बंद होणार

भारतानंतर आता हाँगकाँगमध्ये देखील या टिकटॉक (TikTok) App बंद होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जुलै : भारतामध्ये एकूण 59 चिनी Apps वर बंदी आणण्यात आली आहे. यामध्ये कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या टिकटॉक (TikTok) या अॅपचा देखील समावेश आहे. दरम्यान आता हाँगकाँगमध्ये देखील या App चे ऑपरेशन बंद होणार आहे. एएफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉकने अशी माहितीनुसार ते हाँगकाँगमधील ऑपरेशन थांबवणार आहेत

भारतामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बॅन करण्यात आलेल्या टिकटॉकने हाँगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीन सरकारच्या नव्याने लागू केलेल्या कायद्यानंतर ऑपरेशन्स थांबविणे आणि हाँगकाँगमधून बाहेर पडण्याचा निर्णय या टिकटॉक या चिनी Appने घेतला आहे. या कायद्यानुसार कंपन्यांना युजर डेटा देणे आणि देशात व्यवसाय करण्यासाठी सेन्सॉरशीप विनंत्यांचे पालन करणे आवश्यक आहे. काही इतर कंपन्या देखील असाच निर्णय घेण्याच्या विचारात आहेत.

(हे वाचा-PoKमध्ये 'या' कारणामुळं चीनविरोधात संताप, रस्त्यावर उतरून नागरिकांचं आंदोलन)

जागतिक स्तरावर युजर्सना आकर्षित करण्यासाठी टिकटॉकच्या पॅरेंट कंपनी ByteDance ने हा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांच्या चीनच्या मुळापासून दूर जाता येईल. गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक नकारात्मक गोष्टींसाठीच चर्चेत आहे. भारताने हे App बंद केल्यानंतर या चर्चांमध्ये विशेष वाढ झाली आहे. आयओएस iOS मध्ये युजरच्या परवानगीशिवाय लक्ष ठेवून असल्याचा आरोप या App वर करण्यात आला आहे.

या अॅपच्या माध्यमातून युजरचा डेटा चिनी सरकारकडे पाठवला जात असल्याचा आरोप होत असल्याने ऑस्ट्रेलियामधून देखील App बॅन होण्याची शक्यता आहे. टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर म्हणाले की, 'चिनी सरकारने युजरच्या डेटाची कधीच विनंती केली नाही, किंवा कंपनी कधी हा डेटा देणारही नाही.'

संपादन - जान्हवी भाटकर

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 7, 2020, 9:37 AM IST
Tags: tiktok

ताज्या बातम्या