Home /News /videsh /

विमानातून पडलेली बर्फाची लादी आदळली दुसऱ्या विमानावर, 35 हजार फुटांवर अपघात; थोडक्यात बचावले प्रवासी

विमानातून पडलेली बर्फाची लादी आदळली दुसऱ्या विमानावर, 35 हजार फुटांवर अपघात; थोडक्यात बचावले प्रवासी

वरून जाणाऱ्या विमानातून एक बर्फाची लादी खाली पडली. नेमकं त्याच वेळी खालूनही एक विमान जात होतं. त्यावर ती पडली.

    लंडन, 29 डिसेंबर: एका विमानातून (Airplane) कोसळलेली बर्फाची लादी (Big Ice Cube) दुसऱ्या विमानावर येऊन आदळल्यामुळे (Dashed) झालेल्या अपघातातून (Accident) शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले (Saved) आहेत. वेगवेगळ्या उंचीवरून चाललेल्या विमानांपैकी एका विमानातून बर्फाची एक भलीमोठी लादी बाहेर पडली. त्या विमानाच्या काही फूट खालून दुसरं विमान चाललं होतं. ही लादी त्या विमानावर येऊन आदळली. त्यानंतर विमानाचं किरकोळ नुकसान झालं. अचानक गेला तडा लंडनवरून बोईंग 777 हे विमान सॅन जोन्सला जाण्यासाठी उडालं होतं. लंडनवरून नाताळच्या सुट्ट्या सेलिब्रेट करण्यासाठी 200 प्रवासी या विमानानं चालले होते. तेवढ्यात दुसऱ्या विमानातून पडलेली बर्फाची एक लादी या विमानावर येऊन आदळली. या लादीमुळे ब्रिटीश एअरवेजच्या या विमानाची विंड स्क्रीन तुटली. ही घटना घडली तेव्हा विमान तब्बल 35 हजार फूट उंचीवर होतं. इमर्जन्सी लँडिंग या अपघातानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सॅन जोन्समध्ये हे विमान उतरवण्यात आलं. अचानक विमानात हादरल्यानं आणि इमर्जन्सी लँडिंगची सूचना मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये काहीशी घबराट पसरली होती. मात्र बर्फाच्या लादीमुळे फारसं नुकसान झालं नसल्यामुळे विमानानं सुरक्षितपणे लँडिंग केलं. प्रवाशांचे अनुभव या घटनेत कुणीही जखमी झालं नाही, मात्र प्रवाशांना वेगळाच मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेतील प्रवाशी इमर्जन्सी लँडिंगनंतर जवळपास 50 तास अडकून पडले. ब्रिटीश एअरवेजच्या ऍपवर या घटनेविषयी कुठलेही अपडेट्स देण्यात आले नव्हते. त्यामुळे या विमानाने येणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी त्यांचे नातेवाईक विमानतळावर आले होते. त्यांनाही तब्बल 50 तास प्रतिक्षा करावी लागली. हे वाचा- काय सांगता! NASA विविध धर्मांच्या पुरोहितांद्वारे एलिअन्सशी साधणार संवाद? वाचा ब्रिटीश एअरवेजकडून नुकसान भरपाई आपल्या विमान कंपनीकडून प्रवाशांना जो त्रास झाला, त्याची दिलगिरी व्यक्त करतानाच ब्रिटीश एअरवेजनं प्रत्येक प्रवाशाला 520 पाउंड मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. ही रक्कम भारतीय चलनात 52 हजार रुपये एवढी होते.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Accident, Airplane, Britain

    पुढील बातम्या