बांग्लादेशात मशिदीत भीषण स्फोट, 14 जणांचा मृत्यू, 13 जण गंभीर

सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. ताताडीने मशिदीमधून लोकांना बाहेर कढण्यात आलं.

सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. ताताडीने मशिदीमधून लोकांना बाहेर कढण्यात आलं.

  • Share this:
    ढाका 05 सप्टेंबर: बांग्लादेशमधलं नारायणगंज हे शहर भीषण स्फोटाने हादरून गेलं आहे. इथे एका मशिदीत स्फोट झाला. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला असून13 जणांची प्रकृत गंभीर आहे. जखमींना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नारायणगंज मधल्या या मशिदीत एकाचवेळी 7 एसी मशिन्समध्ये हे स्फोट झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या हॉस्पिटलमध्ये 37 जखमींना भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या स्फोटामागे घातपात आहे का अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रथमदर्शनी असं काहीही नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. काही तांत्रिक बिघाडामुळे एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये हे स्फोट झाले असावेत असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यानंतर फायर ब्रिगेड आणि सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. ताताडीने मशिदीमधून लोकांना बाहेर कढण्यात आलं. तर जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहात आहे.पंतप्रधान शेख हसिना यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार करण्याची सूचना त्यांन प्रशासनाला केली असून मदतीचं आश्वासनही दिलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: