भूतानच्या संसदेने समलैंगिक संबंधांबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; राजाच्या परवानगी प्रतीक्षा

भूतानच्या संसदेने समलैंगिक संबंधांबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; राजाच्या परवानगी प्रतीक्षा

या निर्णयामुळे भूतानमधील अनेक नागरिकांना आनंद व्यक्त केला आहे

  • Share this:

थिम्पू, 13 डिसेंबर : भूतानच्या (Bhutan) संसदेत समलैंगिक संबंधाना मान्यता देण्यात आली असून यापुढे ते अपराध (Homosexuality Decriminalizes)  ठरणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे एलजीबीटी (LGBTQ rights) समुदायाचे नागरिक आनंदीत झाले आहेत. संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीत (Parliament joint Committee) यासंबंधी निर्णय घेण्यात आला असून या संबंधांना गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात आले आहे. यापूर्वी भूतानमध्ये समलैंगिक संबंध हे अपराध ठरत होते. भूतानच्या दंड विधानानुसार कलम 213 आणि 214 नुसार हे अपराध ठरत होते.  परंतु काल झालेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत हे कलम रद्द करण्यात आल्यामुळे या संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.

रॉयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेला भूतानमधील खासदार आणि संयुक्त संसदीय समितीचे उपाध्यक्ष उज्ञेन वांगडी (Ugyen Wangdi) यांनी दिलेल्या माहितीनुसार या बिलाला 100 टक्के मान्यता देण्यात आहे. दोन्ही सदनांतील 69 पैकी 63 सदस्य मतदानावेळी उपस्थित होते. तर सहा सदस्य अनुपस्थित होते. यापूर्वी भूतानमध्ये या संबंधांना अनैसर्गिक संबंध म्हटलं जात असे. परंतु यापुढे ते सामान्य संबंधांमध्ये गृहित धरले जाणार आहेत.

राजाची परवानगी बाकी

भूतानच्या संसदेने या कायद्याला मंजुरी दिलेली असली तरीदेखील भूतानच्या राजाची मंजुरी मिळणे बाकी आहे. राजाने याला मंजुरी दिल्यानंतर याचे कायद्यात रूपांतर होणार असून समलैंगिक संबंध अधिकृत होणार आहेत. याविषयी मानवाधिकार कार्यकर्ते ताशी शेटेन (Tashi Sheten ) यांनी प्रतिक्रिया देताना आपण खूप आनंदित असल्याचे आणि एलजीबीटी कम्युनिटीचा हा विजय असल्याचे म्हटले आहे.

भूतानच्या नागरिकांसाठी जल्लोषाचा दिवस

भुतानने या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेमध्ये एलजीबीटी (LGBTQ) समुदायाची देखील मोजणी केली जाणार आहे. देशभरातील सर्व समुदायाला शिक्षणाचा आणि आरोग्याचा अधिकार मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर रॉयटर्सशी बोलताना भूतानमध्ये या समुदायासाठी काम करणाऱ्या रेनबो (Rainbow) या संस्थेचे डायरेक्टर शेटेन यांनी हा मानवाधिकारांचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर भूतानमधील नागरिकांचे देखील त्यांनी आभार मानले. भूतानमधील नागरिकांना या समुदायाला पाठिंबा दिल्याने हे शक्य झाल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्याचबरोबर भूतानमधील प्रत्येक नागरिकांसाठी आजचा हा दिवस जल्लोषाचा असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

भारतात 2018 मध्ये समलैंगिक संबधांना मान्यता

भारतात यापूर्वीच समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यात आली असून 2018 मध्ये याला अपराधाच्या श्रेणीतून वगळण्यात आले होते. भारतात एकूण 25 लाखांपेक्षा अधिक एलजीबीटी (LGBTQ) नागरिकांची संख्या आहे. भूतानमध्ये या कायद्याला मान्यता देण्यात आल्यानंतर आता आशिया खंडातील अनेक देशांतदेखील या संबंधांना मान्यता देण्यात आली आहे. भूतानमध्ये बौद्ध धर्माचे नागरिक सर्वाधिक असून देशाची लोकसंख्या 8 लाख आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 13, 2020, 10:09 AM IST

ताज्या बातम्या