एवढा मोठा नेता इतक्या नम्र कसा.. कमाल! : 'या' देशाच्या पंतप्रधानांनी केलं मोदींचं कौतुक

एवढा मोठा नेता इतक्या नम्र कसा.. कमाल! : 'या' देशाच्या पंतप्रधानांनी केलं मोदींचं कौतुक

'कोट्यवधी लोकसंख्येचा देश चालवणारा नेता, सर्वांत मोठ्या लोकशाहीचं नेतृत्व करणारा पंतप्रधान विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना काय मानसिकता ठेवली पाहिजे अशा विषयांवर सूक्ष्मपणे कसा काय व्यक्त होऊ शकतो.. कमाल!'

  • Share this:

थिंफू (भूटान), 15 ऑगस्ट : कोट्यवधी लोकसंख्येचा देश चालवणारा नेता, सर्वांत मोठ्या लोकशाहीचं नेतृत्व करणारा पंतप्रधान विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना काय मानसिकता ठेवली पाहिजे अशा विषयांवर सूक्ष्मपणे कसा काय व्यक्त होऊ शकतो, हे वाचून आश्चर्य वाटलं... अशा शब्दांत भूतानच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी पुढच्या दोन दिवसांत भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी भूतानी पंतप्रधानांनी अधिकृत फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. भूतानी पंतप्रधान डॉ. लोताय त्शेरिंग यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय की, Exam Warriors हे नरेंद्र मोदी लिखित पुस्तक माझ्या संग्रहात होतं. ते हाताशी लागलं तेव्हा मी वाचलं आणि अनेक गोष्टींबद्दल मला कौतुक आणि नवल वाटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आणि मूल्यशिक्षणाला वाहिलेलं Exam Warriors हे पुस्तक काही काळापूर्वी प्रसिद्ध झालं होतं. त्याविषयी भूतानच्या पंतप्रधानांनी कौतुकाने लिहिलं आहे.

"या पुस्तकाताल योगाविषयीचं प्रकरण तर आवर्जून वाचावं असं आहे.

हे ही वाचा : 370 हटवल्यानंतरचा लडाखमधील स्वातंत्र्य दिन; भाजप खासदाराच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल

मोदींनी योगाचं महत्त्व नमूद केलं आहे. मी स्वतः एक डॉक्टर आहे. त्यामुळे मला योगासनांचे फायदे माहिती आहेत आणि अनुभवही आहे. नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होईल याकडे लक्ष दिलं. त्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिशः ऋणी आहे", असंही डॉ. त्शेरिंग यांनी लिहिलं आहे.

---------------------------------

लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकला इशारा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 06:33 PM IST

ताज्या बातम्या