ब्रुसेल्स, 10 जून : आपण ऑर्डर न करता आपल्या दारी फुकट पिझ्झा (PIZZA) आला आणि तो चुकून नव्हे तर आपल्यासाठीच आला असेल तर प्रत्येकाला आनंदच होईल. बरं असा फुकट पिझ्झा तुम्हाला दहा वर्ष मिळाला, तर मग तुम्ही म्हणाल असं फक्त स्वप्नातच होईल. साहजिकच दहा वर्ष फुकट पिझ्झा कोणीच खाऊ घालणार नाही. मात्र बेल्जिअममधील (belgium) एका व्यक्तीला गेली 10 वर्ष असा फुकट पिझ्झा मिळतो आहे, जो तिने कधीच ऑर्डर केला नाही.
65 वर्षांचे जिन वॅन लँडघेम (Jean Van Landeghem) यांच्या दारी ऑर्डर न करताच गेली 10 वर्ष पिझ्झा येत आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत जिन यांना 14 पिझ्झा मिळालेत. 10 वेगवेगळ्या डिलीव्हरी बॉयजने हे पिझ्झा डिलीव्हर केले. आतापर्यंत जितके पिझ्झा जिन यांना मिळालेत, त्यासाठी त्यांना एकही पैसा मोजावा लागला नाही. कारण डिलीव्ही बॉयज पैसे घेतच नाहीत.
हे वाचा - कोरोनाच्या संकटात जगातील 'हे' 10 देश सर्वाधिक सुरक्षित; पाहा भारत कितव्या स्थानी
न्यूयॉर्क पोस्टमधील रिपोर्टनुसार खरंतर फ्री पिझ्झा मिळत असल्याने जिन घाबरले आहेत. एका स्थानिक मीडिया पोर्टलशी बोलताना ते म्हणाले, "जेव्हा मला स्कूटरचा आवाज येतो तेव्हा मला भीती वाटते, की कुणीतरी माझ्या जारी पिझ्झा घेऊन आलं की काय?"
सुरुवातीला जिन यांना वाटलं की कुणीतरी चुकून चुकीचा पत्ता या पिझ्झा डिलीव्हरीसाठी दिला असेल. मात्र गेली दहा वर्ष असंच होतं आहे. त्यामुळे कुणीतरी हे मुद्दाम करत आहे, हे त्यांना स्पष्ट झालं.
हे वाचा - 'या' कपाटात लपली आहे मांजर; शोधा बरं तुम्हाला सापडतेय का?
जिन हे एकटेच नाहीत. तर जवळच्या शहरात राहणाऱ्या त्यांच्या मित्राला अनेकदा असा पिझ्झा मिळाला आहे. दोघांनाही पिझ्झा पाठवणारी व्यक्ती एकच आहे, अशी खात्री जिन यांना आहे. मात्र अद्यापही ती व्यक्ती सापडलेली नाही.
स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना जिन यांनी पिझ्झाच्या दहशतीमुळे आपल्या आयुष्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं. फक्त पिझ्झाच नव्हे ऑर्डर न करता कबाबही आपल्या घरी डिलीव्हर झाल्याचं ते म्हणाले. संबंधित प्रशासनाला याची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्या व्यक्तीची ओळखच स्पष्ट झालेली नाही.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - लहान मुलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; पालकांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष नको