Home /News /videsh /

वाह गं पोरी! 19 वर्षांच्या मुलीची आश्चर्याकारक कामगिरी, करून दाखवला अशक्य असा विक्रम

वाह गं पोरी! 19 वर्षांच्या मुलीची आश्चर्याकारक कामगिरी, करून दाखवला अशक्य असा विक्रम

हा विक्रम करण्यासाठी तिला 155 दिवसांचा कालावधी लागला. 20 जानेवारी 2022 (गुरुवारी) रोजी झारानं पश्चिम बेल्जियममध्ये आपल्या विमानासह उतरून मोहिमेचा शेवट केला.

बेल्जियम, 21 जानेवारी: आपण सर्रास एखाद्या व्यक्तीचं बाह्यरूप पाहून त्याच्या क्षमतेचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो. ती व्यक्ती एखादं अशक्य काम करू शकेल, याची कल्पनाही आपण करत नाही. एकूणच काय तर बर्‍याच वेळा आपण लोकांना खूप कमी लेखतो. पण, जर एखाद्या व्यक्तीनं दृढ निश्चय केला तर ती कुठलंही आव्हान पार करू शकते, ही गोष्ट आपण विसरून जातो. ब्रिटनमधील एका मुलीनं ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. या 19 वर्षीय मुलीनं विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. झारा रुदरफोर्ड (Zara Rutherford set world record) असं या मुलीचं नाव आहे. बेल्जियन-ब्रिटिश पायलट (Pilot) असलेल्या झारा रदरफोर्डनं आपल्या लहान विमानाच्या सहाय्यानं जगभरात एकटीनं प्रवास (World Tour) केला. तिच्या या कामगिरीमुळे तिच्या नावावर जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. एकटीनं जग प्रवास करणारी ती सर्वांत तरुण महिला ठरली आहे. हा विक्रम करण्यासाठी तिला 155 दिवसांचा कालावधी लागला. 20 जानेवारी 2022 (गुरुवारी) रोजी झारानं पश्चिम बेल्जियममध्ये आपल्या विमानासह उतरून मोहिमेचा शेवट केला. हे वाचा-समुद्रात बुडतंय ऐतिहासिक जकार्ता, इंडोनेशियानं शोधली दुसरी राजधानी आपल्या जग प्रवासादरम्यान झारानं अनेक भयावह साहसी अनुभव घेतले. विमान उड्डाणादरम्यान तिनं सायबेरियातील (Siberia) गोठलेला टुंड्रा प्रदेश (Tundra), फिलिपाइन्समधील टायफूनचा (Typhoon) सामना केला. एवढंच नाही तर अरबी वाळवंटसुद्धा (Arabian Desert) तिनं आकाशातूनच पाहिलं. 52 हजार किलोमीटर (28 हजार नॉटिकल मैल) पेक्षा जास्त अंतराच्या या एअर ट्रेकमध्ये, झारा पाच खंडांमध्ये थांबली आणि 41 देशांना भेट दिली. या साहसी मोहिमेदरम्यान झाराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. एकदा तिचं 'वन सीटर शार्क मायक्रोलाइट प्लेन' (One seater shark microlight plane) कॅलिफोर्नियातील जंगलातील आगीमुळं दुर्गंधीनं भरलं होतं. अनेकदा समुद्रात किंवा निर्जन भागात ती एकटीच उडत होती. एकदा, सायबेरियातील 'अयान' या लहानशा गावात कित्येक आठवडे ती एकाकी राहिली. या काळात कुटुंबीयांशी किंवा जगाशी तिचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता, असे अनुभव झारा रदरफोर्डनं सांगितले. हे वाचा-जे करायचे ते करा, मिसाईल टेस्ट सुरूच राहतील! किम जोंगचे अमेरिकेला खुले आव्हान विमानातून जग प्रवासाचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर झारा रदरफोर्डनं तो आपल्या कुटुंबाला समर्पित केला. याशिवाय एव्हिएशनसारख्या (Aviation) पुरुषप्रधान (Male Dominated) क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व तरुणींनादेखील तिनं हा विक्रम समर्पित केला आहे. 'मुलींनी या क्षेत्रात पुढं गेलं पाहिजे. यासाठी वेळ, संयम आणि खूप मेहनत घ्यावी लागेल मात्र, प्रयत्न केल्यास अशक्य काहीच नाही, असं झारा म्हणाली. झारा रुदरफोर्डनं केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. एव्हिएशन सेक्टरमध्ये करिअर करण्यास इच्छुक असलेल्या मुलींना तिच्यापासून प्रेरणा मिळेल.
First published:

Tags: World record

पुढील बातम्या