मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'व्होडका प्या, कोणी मरणार नाही'; या देशाच्या राष्ट्रपतींचा कोरोना रुग्णांना अजब सल्ला

'व्होडका प्या, कोणी मरणार नाही'; या देशाच्या राष्ट्रपतींचा कोरोना रुग्णांना अजब सल्ला

कोरोनावर उपाय करण्यासाठी कोणताही लस अद्याप उपलब्ध नाही आहे. मात्र कोरोनाला हरवण्यासाठी व्होडका पिण्याचा सल्ला एका राष्ट्रपतींनी दिला आहे.

कोरोनावर उपाय करण्यासाठी कोणताही लस अद्याप उपलब्ध नाही आहे. मात्र कोरोनाला हरवण्यासाठी व्होडका पिण्याचा सल्ला एका राष्ट्रपतींनी दिला आहे.

कोरोनावर उपाय करण्यासाठी कोणताही लस अद्याप उपलब्ध नाही आहे. मात्र कोरोनाला हरवण्यासाठी व्होडका पिण्याचा सल्ला एका राष्ट्रपतींनी दिला आहे.

  मिन्‍स्‍क, 14 एप्रिल : कोरोनामुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मुख्य म्हणजे कोरोनावर उपाय करण्यासाठी कोणताही लस अद्याप उपलब्ध नाही आहे. यामुळं लोकांना सतत हात धुणे आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र कोरोनाला हरवण्यासाठी बेलारूसच्या राष्ट्रपतींनी अजब सल्ला दिला आहे. बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मते, कोरोनाला हरवण्यासाठी लस नसेल तर, त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे व्होडका. अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी लोकांना व्होडका पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यामते व्होडका प्यायल्यामुळे शरिरात उष्णता वाढेल. दुसरीकडे बेलारूसमध्ये अधिकृतपणे कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दोन डझनहून अधिक आहे. इतकेच नाही तर कोरोना विषाणूवर अलेक्झांडरने असे म्हटले आहे की, मद्यपान करणे, ट्रॅक्टर चालवणे, बकरीसोबत खेळण्याने हा आजार बरा होईल. वाचा-आता हे अँटी-व्हायरल औषध कोरोनाला हरवणार, ICMRने दिली महत्त्वाची माहिती अलेक्झांडर यांना ब्रिटीश माध्यमांत हुकूमशहा म्हटले जाते. अलेक्झांडरवर असेही आरोप आहेत की ते डॉक्टर आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि कोरोनाला गांभीर्याने घेत नाही आहे. यामुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रपती अलेक्झांडर यांनी लॉकडाऊन करण्यास नकार दिला आहे. देशातील 95 लाख लोकांना उद्देशून अलेक्झांडर यांनी, 'कोरोनाला रोखण्यासाठी औषधे आम्ही शोधली आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची गरज नाही', असे सांगितले होते. वाचा-स्वाइन फ्लूपेक्षा कोरोना खतरनाक; लस मिळाली नाहीतर...,WHOने व्यक्त केली चिंता 65 वर्षीय अलेक्झांडर 25 वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. कोरोना रोग बरा करण्यासाठी कोणत्या औषधाविषयी ते बोलत आहेत हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले नाही. कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांना संबोधित करताना अध्यक्ष अलेक्झांडर यांनी, 'काळजी करण्याची गरज नाही. आपल्या देशात कोरोना विषाणूमुळे कुणाचा मृत्यू झालेला नाही. मी हे जाहीरपणे सांगत आहे, असे लोकांना सांगितले. वाचा-लॉकडाऊन हटवताच पसरला कोरोना, चीनमध्ये प्रत्येक तासाला कोरोनाचे 3 नवीन रुग्ण
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या