Beirut Blast: 'माझ्या पायाखाली मृतांचा खच होता...', स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शीनं सांगितला काटा आणणारा अनुभव

Beirut Blast: 'माझ्या पायाखाली मृतांचा खच होता...', स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शीनं सांगितला काटा आणणारा अनुभव

या स्फोटाची भीषणता इतकी होती की, तब्बल 10 मैलपर्यंतचा परिसर हादरला. असे सांगितले जात आहे की, जहाजमध्ये असलेल्या फटाक्यांचा स्फोट झाला.

  • Share this:

बैरुत, 6 ऑगस्ट : लेबननची (Lebanon) राजधानी बैरुतमध्ये (Beirut blasts) 4 ऑगस्ट रोजी मोठा स्फोट झाला. यात आतापर्यंत 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4000हून अधिक जखमी झाले आहे. या स्फोटाची भीषणता इतकी होती की, तब्बल 10 मैलपर्यंतचा परिसर हादरला. असे सांगितले जात आहे की, जहाजमध्ये असलेल्या फटाक्यांचा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यात तीन मजल्यांपर्यंत वर उडाल्या.

दरम्यान हा स्फोट झाल्यानंतर हा अणुबॉम्ब हल्ला (Nuclear blast) असल्याचे सांगितले जात होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही हा स्फोट नसून बॉम्ब हल्ला झाल्याचे म्हटले होते. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार हा अणुबॉम्ब हल्ला नसून अमोनियम नायट्रेटचा (ammonium nitrate ) स्फोट असल्याचे सिद्ध झाले आहे.

वाचा-Beirut Blast: 12 सेकंदात उद्धवस्त झालं शहर! 73 जणांचा मृत्यू 4000 लोकं जखमी, पाहा धडकी भरवणारा VIDEO

वृत्तसंस्था एएफपीला एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की आसपासची सर्व इमारती कोसळल्या आहेत. सायप्रसपासून सुमारे 240 किलोमीटर दूर पूर्वेच्या भूमध्य भागात स्फोटाचा आवाज ऐकू आला. यावेळी प्रत्यक्षदर्शीने असेही सांगितले की, हा आवाज ऐकून जेव्हा तो घटनास्थळी पोहचला तेव्हा, सगळीकडे रक्तबंबाळ अवस्थेत लोकं पडले होते. जळलेले मृतदेह रस्त्यावर पडले होते. हा स्फोट झाल्यानंतर लगेचच लोकांनी मदत कार्यास सुरुवात केली. मात्र एवढ्या जखमींना ठेवण्यासाठी शहरातील रुग्णालयही कमी पडली.

वाचा-सोशल मीडियावर VIRAL झालेल्या बैरूतच्या स्फोटाचं कारण उघड; शहराची काय स्थिती झाली

2014पासून गोदामात होती स्फोटकं

बैरूतमध्ये झालेला स्फोट नायट्रेटमुळे झाला असावा असे सांगण्यात आले आहे. या गोदामात 2014 पासून एक स्फोटक स्टोअर असल्याचे सांगितले जात आहे. गृहमंत्र्यांनी घटनेविषयी स्थानिक माध्यमांना सांगितले की, बंदरावर मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट आहे. लेबनीज कस्टमची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे की बंदरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट काय करीत आहे? दुसरीकडे, लेबनीजचे प्रसारक मायडेन यांनी कस्टम संचालकांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की सुमारे एक टन नायट्रेटचा स्फोट झाला असावा.

Published by: Priyanka Gawde
First published: August 6, 2020, 2:08 PM IST

ताज्या बातम्या