आधी भीक मागायची, आता न्यायाधीश होण्याचं स्वप्न; ट्रान्सजेंडर निशा रावचा थक्क करणारा प्रवास!

आधी भीक मागायची, आता न्यायाधीश होण्याचं स्वप्न; ट्रान्सजेंडर निशा रावचा थक्क करणारा प्रवास!

जिद्द आणि काहीतरी करण्याची तयारी असेल तर अशक्य काहीच नाही. निशाच्या या प्रवासातूनही आपण हेच शिकतो.

  • Share this:

कराची, 27 नोव्हेंबर : पाकिस्तानमधील (Pakistan) पहिली ट्रान्सजेंडर (Transgender) वकील निशा राव (Nisha Rao) यांचं आता न्यायाधीश व्हायचं स्वप्न आहे. निशा सध्या कराची येथे सराव करीत असून न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याचे तिचे स्वप्न आहे. 28 वर्षीय निशाचे आयुष्य अनेक समस्यांनी भरलेले आहे. वकिली करण्यापूर्वी ती पोटासाठी भीक मागत असे, परंतु सर्व त्रासांचा पराभव करून तिने 'काळा कोट' परिधान केला आणि आता तर तिला न्यायाधीश व्हायचं आहे.

2018 मध्ये आला होता कायदा आला

वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना निशा राव म्हणाल्या की, पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर न्यायाधीश होणं हे त्यांचं ध्येय आहे. पाकिस्तानमध्ये ट्रान्सजेंडर्सला सामान्यांप्रमाणे मान्यता देणारा कायदा 2018 मध्ये मंजूर करण्यात आला होता. या कायद्यानुसार ट्रान्सजेंडर्ससोबत भेदभाव आणि हिंसा केल्यास शिक्षेची तरतूद आहे. ही बाब वेगळी की, प्रत्यक्षात त्यांना अद्याप सामान्य नागरिकांसारखे अधिकार मिळाले नाहीत.

हे ही वाचा-बलात्कारीला रासायनिक पद्धतीनं करणार नपुंसक; भारताशेजारील देशाचा मोठा निर्णय

घर सोडलं आणि...

पाकिस्तानमधील बहुतेक ट्रान्सजेंडर असमानता आणि अन्यायाचा सामना करतात आणि रस्त्यावर भीक मागून किंवा विवाहसोहळ्यांमध्ये नाचवून आपलं जीवन जगतात. निशा राव निश्चितच याला अपवाद आहेत. पूर्वोत्तर लाहोर शहरातील राव या एका शिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी जेव्हा त्यांना त्या इतरांपेक्षा वेगळं असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी घर सोडलं. 

असा केला अभ्यास

निशाच्या म्हणण्यानुसार, ट्रान्सजेंडर समुदायाचा भाग झाल्यानंतर समाजातील ज्येष्ठ लोकांनी त्यांना जीवनासाठी भीक मागावी किंवा लैंगिक कामगार व्हावे लागेल असे सांगितले. यानंतर, राव यांनी ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागून आपले नवीन जीवन सुरू केले, परंतु त्यांची स्वप्ने मोठी होती. त्यांनी कसा तरी कायद्याचा अभ्यास सुरू केला. भीक मागून त्या स्वत:च्या अभ्यासासाठी पैसे खर्च करायची.

50 प्रकरणे लढली

अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर शेवटी त्या वकील बनल्या. या वर्षाच्या सुरूवातीला, त्यांना प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळाला आणि कराची बार असोसिएशनच्या सदस्या झाल्या. त्यांनी आतापर्यंत 50 केसेस लढल्या आहेत. निशा या ट्रान्सजेंडरसाठी काम करणाऱ्या ट्रान्स-राइट्स या स्वयंसेवी संस्थेशीही संबंधित आहे. आता त्यांची इच्छा पाकिस्तानतील पहिली ट्रान्सजेंडर न्यायाधीश व्हावा अशी आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 27, 2020, 7:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading