बँकॉक, 18 जानेवारी : दारूच्या आणि ड्रग्जच्या नशेत माणूस काय करेल; काही सांगता येत नाही. स्वप्नात विचार न केलेल्या गोष्टी देखील अनेकदा माणूस दारूच्या आणि ड्रग्जच्या नशेत करतो. यामुळे सामान्य माणूस शुद्धीवर असताना ज्या गोष्टींचा विचार देखील करत नाही अशी गोष्ट नुकतीच बँकॉक (Bangkok) मधील एका माणसाने केली आहे. या माणसाने ड्रग्जच्या नशेत गाडी थेट एअरपोर्टवरील धावपट्टीवर घालण्याचा पराक्रम केला आहे.
बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर (Suvarnabhumi Airport) गुरुवारी 14 जानेवारीला ही घटना घडली आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती थाईगर वृत्तसंस्थेने दिलेल्या (Thaiger) रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. ट्विटरवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या दुचाकीच्या मदतीने ही कार धावपट्टीवरून बाहेर नेत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला असून आतापर्यंत 10,85,000 जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे.
งามไส้ บริษัทหมื่นล้าน AOT ปล่อยให้ รถ ที่ไม่ได้รับอนุญาต บุกเข้าไปวิ่งพล่านข้างเครื่องบิน นี่คือ safety & security breach ที่ร้ายแรงมากครับ #สาระการบินน่ารู้ pic.twitter.com/MwkPNHawDe
— คนไทยไม่ยอม YNWA (@Khongsak) January 14, 2021
यासंदर्भातील हे फुटेज थाई व्हिसाने रिलीज केले असून जबरदस्ती या माणसाने विमानतळावरील धावपट्टीवर प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. या बातमीत पुढे असे नमूद केले आहे की थायलंडच्या विमानतळाने एका निवेदनामार्फत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांना या व्यक्तीच्या गाडीत मेथमॅफेटामाइन (Methamphetamine) हे ड्रग्ज आढळल्याचे देखील म्हटले आहे. त्याला विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे, अवैधपणे ड्रग्ज बाळगणे आणि अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
या पद्धतीची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. रशियामध्ये (Russia) याआधी एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गाडी थेट एअरपोर्टच्या आतमध्ये घुसवल्याची घटना घडली होती. ही व्यक्ती दारूच्या नशेत गाडी चालवत रशियाच्या कझान एअरपोर्टमध्ये(Kazan Airport) घुसली होती. एपीने दिलेल्या वृत्तानुसार कझान एअरपोर्टच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती दारूच्या नशेत टर्मिनलच्या दरवाज्यापर्यंत आली होती. त्यानंतर चेक इन गेट पार करून डिपार्चर गेटवर घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडण्यात आले. रुसलान(Ruslan Nurtdinov) असे या 40 वर्षीय व्यक्तीचे नाव असून त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी तो विमानतळात घुसल्याची माहिती न्यायाधीशांसमोर दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.