कोरोनाला हरवणं शक्य! 'ही' औषधं वापरून फक्त 4 दिवसांत डॉक्टरांनी बरे केले 60 रुग्ण

कोरोनाला हरवणं शक्य! 'ही' औषधं वापरून फक्त 4 दिवसांत डॉक्टरांनी बरे केले 60 रुग्ण

जग कोरोना विषाणूची औषधे आणि लस तयार करण्यात गुंतलेला असताना या देशातील डॉक्टरांनी काही औषधांचा वापर करून कोरोना रुग्णावर यशस्वी उपचार केले.

  • Share this:

ढाका, 19 मे : कोरोनानं साऱ्या जगात थैमान घातलं आहे. मात्र अद्याप एकाही देशाला कोरोनावर लस शोधता आलेली नाही आहे. त्यामुळं आता जगभरातील शास्त्रज्ञ औषध शोधण्यावर भर देत आहेत. याआधी चीन आणि हॉंगकॉंगनं औषधांचे मिश्रण वापरून त्याचा प्रयोग केला. आता बांगलादेशमध्येही आता डॉक्टरांनी असाच एक प्रयोग केला. यात त्यांना यशही आले आहे. बांगलादेशी डॉक्टरांनी काही औषधांचे मिश्रण वापरून चार दिवसात कोरोना रुग्ण निरोगी केला.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तारेख आलम बांगलादेश मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे प्रमुख यांनी 2 औषधं वापरून एकूण 60 रुग्णांवर उपचार केले. मुख्य म्हणजे उपचारानंतर 60च्या 60 ही रुग्ण निरोगी झाले. आलम यांनी, डोव्हिसिक्लिन (Doxycycline) या अँटीबायोटिकच्या एका डोसमध्ये इव्हर्मेक्टिन (Ivermectin ) नावाचे अँटीप्रोटोझोल औषधाचे मिश्रण केले. यानंतर डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर याचा प्रयोग केला. मुख्य म्हणजे प्रयोग केलेले सर्व रुग्ण निरोगी झाले आहे.

वाचा-सर्वात मोठं यश! 24 शास्त्रज्ञांनी शोधला कोरोनाला मारण्याचा यशस्वी फॉर्म्युला

दरम्यान, डॉक्टरांनी सुरुवातीला लक्षणं न सापडलेल्या मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कोरोना रुग्णांवर या औषधांचा प्रयोग केला. मुख्य म्हणजे या औषधांचा प्रयोग केल्यानंतर केवळ 4 दिवसात रुग्णांनी प्रकृती बरी झाली. त्यांच्यावर औषधांचे कोणतेही साइट इफ्केट झालेले आढळले नाही. बांगलादेशमध्ये कोरोनाचे 21 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर, 300हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.

चीनचा औषधांचा फॉर्म्युला

चिनी शास्त्रज्ञांच्या मते ही चार अँटीबॉडी एकत्र कोरोना विषाणूवर सर्वतोपरी आक्रमण करता येईल. यामुळं कोरोना विषाणूचे बाह्य थर नष्ट होईल, त्यामुळं ते आपल्या शरीरातील पेशींना चिकटणार नाही. चीनमधील 24 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. या चार अँटीबॉडीजमुळं कोरोनाला काही प्रमाणात मारण्यात यश येईल. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या चार अँटीबॉडींची नावं-बी 38, एच 4, बी 5 आणि एच 2 अशी आहेत. ही 4 अँटीबॉडी आपल्या शरीरातील पेशींवर असलेल्या एन्झाइम एसीई -2 वर कोरोनाला टिकू देत नाही. या चार अँटीबॉडीमुळे व्हायरसमध्ये असलेले एस-प्रथिने वितळण्यास सुरवात होते आणि काही काळानंतर व्हायरस अदृश्य होतो. या अँटीबॉडी कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णकडून घेतल्या जातात. प्रयोगशाळेत उंदीरांवर त्यांचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

वाचा-लस शोधण्यासाठी निरोगी लोकांना करणार कोरोना पॉझिटिव्ह? WHOची वादग्रस्त चाचणी

हॉंगकॉंगनं ही 3 औषधं वापरून केला होता उपचार

हाँगकाँगच्या 6 शासकीय रुग्णालयांमधील विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या 127 रुग्णांवर औषधांचा वापर केला, असे सांगितले. हाँगकाँगच्या 6 रुग्णालयांमध्ये तीन औषधांचे मिश्रण देण्यात आलेली 86 रुग्ण निरोगी झाली. कारण त्यात तीन अँटीवायरल औषधे होती. यातील प्रथम अँटीवायरल औषध म्हणजे लोपीनावीर-रीटोनाविर (lopinavir-ritonavir-kaletra). रिबाविरिन नावाचे आणखी एक औषधं हे हेपेटायटीस-सीच्या उपचारात वापरली जाते. तिसरे औषध इंजेक्शन आहे. त्याचे नाव इंटरफेरॉन बीटा -1 बी (Interferon Beta-1B) आहे. हे औषध मल्टिपल स्क्लेरोसिस बरे करते जेणेकरून शरीरात वेदना, जळजळ आणि व्हायरस पसरत नाहीत. काही तज्ञांचे मत आहे की इंटरफेरॉन बीटा -1 बी औषध शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करते. जेणेकरुन मानवी शरीर कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढू शकेल.

वाचा-डॉक्टरांना सर्वात मोठं यश! 'ही' तीन औषधं वापरून 7 दिवसांत बरा झाला कोरोना रुग्ण

First published: May 18, 2020, 2:50 PM IST

ताज्या बातम्या