मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सुखी संसाराची स्वप्न भंग..! नवविवाहित दाम्पत्याच्या कारवर कोसळला 80 टन काँक्रीटचा गर्डर

सुखी संसाराची स्वप्न भंग..! नवविवाहित दाम्पत्याच्या कारवर कोसळला 80 टन काँक्रीटचा गर्डर

नवविवाहित दाम्पत्यावर काळानं घाला घातला (accident ) आणि त्यांच्या सुखी संसाराच्या स्वप्नांना नजर लागली. नुकतंच लग्न झालेल्या या नवविवाहित दाम्पत्याच्या गाडीसोबत दुर्घटना घडली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
ढाका : नवविवाहित दाम्पत्यावर काळानं घाला घातला आणि त्यांच्या सुखी संसाराच्या स्वप्नांना नजर लागली. नुकतंच लग्न झालेल्या या नवविवाहित दाम्पत्याच्या गाडीसोबत दुर्घटना घडली आहे. गाडीने जात असताना अचानक कारवर 80 टन काँक्रीटचा गर्डर कोसळला. यामुळे गाडीचा चुराडा झाला. या भीषण दुर्घटनेत (accident) 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ढाका (Dhaka) इथे उत्तरा भागात बीआरटी प्रकल्पाचे काम सुरू असताना अचानक 80 टन वजनाचा काँक्रीट गर्डर कारवर कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. कारचा पूर्ण चुराडा होऊनही जखमी झालेले नवविवाहित दाम्पत्याचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. सध्या या नवदाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

School Bus Accident : बच्चे कंपनीवर आलं होतं मोठं संकट, स्कूल बस रस्त्यावरून खाली उतरली, पण...

पंतप्रधान शेख हसीना यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. गर्डर घेऊन जाणारी ट्रेन कलंडली आणि ती एका बाजूला झुकली, त्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. कारचा मालक रुबेल मियाँ (60), त्याची पत्नी फहिमा, फहिमाची बहीण झरना आणि झरना यांची दोन मुले, जन्नत आणि झकेरिया कारमध्ये अडकले होते. /

Ahmednagar Rain : अहमदनगरमध्ये नदीत वाहून गेलेल्या गाडीसह एक मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरूच

गर्डर काढल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. नवविवाहित दाम्पत्य थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या दुर्घटनेतील मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
First published:

Tags: Accident, Bangladesh

पुढील बातम्या