Home /News /videsh /

खळबळजनक! पाकिस्तानातील कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू; PM मोदींना मानत असे भाऊ

खळबळजनक! पाकिस्तानातील कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू; PM मोदींना मानत असे भाऊ

पाकिस्तानमधील (Pakistan) बलुचिस्तान (balochistan) प्रातांत बलुच नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला कार्यकर्त्या (Women activist) करीमा बलोच (Karima Baloch) यांच्या हत्येमागे पाकिस्तान असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 22 डिसेंबर: पाकिस्तानमधील (Pakistan) बलुचिस्तान (balochistan) प्रातांत बलुच नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला कार्यकर्त्या (Women activist) करीमा बलोच (Karima Baloch) यांचा संशयास्पद मृत्यू (Death) झाला आहे. त्यांचा मृतदेह कॅनडातील (Canada) टोरांटो (Toronto) इथे मिळाला. करीमा बलोच या रविवारपासून बेपत्ता (Missing) होत्या. त्यांनी 2016 साली पाकिस्तानातून पलायन करून कॅनडामध्ये आश्रय घेतला होता. 2016 सालच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत करीमा बलोच यांचंही नाव आलं होत. तसेच त्यांनी पाकिस्तान बलोच लोकांवर होणाऱ्या अन्यायाला संयुक्त राष्ट्रात वाचा फोडली होती. तसेच बलोच स्टुडंट ऑर्गेनायझेशनच्या (Baloch student organisation) अध्यक्षपदी असताना करीमा बलोच यांनी रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांना भाऊ मानत एक भावूक व्हिडिओ जारी केला होता. त्यांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप तारेक फतेह (Tarik Fateh) यांनी केला आहे. याच वर्षी बलोच पत्रकार साजिद हुसैन (Sajid husain) यांचीही हत्या झाली होती. करीमा बलोच या भारताच्या रॉ एजंट आहेत, असा संशय पाकिस्तानच्या ISI ला होता. बलुचिस्तान प्रांत हा नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्ताननं त्यांच  शोषण केल आहे. गेल्या पंधरा वर्षात बलुचिस्तानमधील बंडखोरीचा संघर्ष वाढत गेला आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाच्या अनेक क्रौर्यकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या असंख्य लोकांना पाकिस्तानने निर्दयीपणे तुरूंगात डांबून ठेवलं आहे. अनेक बलोच नेत्यांच्या हत्याही करण्यात आल्या आहेत. करीमा बलोच यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्या आपला भाऊ मानतात. तसेच त्या म्हणाल्या होत्या की सर्व बलोच बहिनी तुमच्याकडे आशेनं पहात आहेत. करीमा बुलोच या बलुचिस्तान स्टुडंट्स ऑर्गनायझेशनची चेअर पर्सनही होत्या. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या