पाहा, भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या बातम्या विदेशी मीडियाने कशा दाखवल्या

भारताकडून पाक व्याप काश्मीरमध्ये केल्या गेलेल्या Air Strike वर चीनला वगळता सगळ्याच देशाच्या प्रमुख मीडिया संस्थांनी बातम्या प्रकाशित केल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 06:15 PM IST

पाहा, भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या बातम्या विदेशी मीडियाने कशा दाखवल्या

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : भारताकडून पाक व्याप काश्मीरमध्ये केल्या गेलेल्या Air Strike वर चीनला वगळता सगळ्याच देशाच्या प्रमुख मीडिया संस्थांनी बातम्या प्रकाशित केल्या आहेत. बऱ्यापैकी सगळ्याच मीडिया संस्थांनी कबुल केलं आहे की, पाकिस्तानवर हवाई हल्ला झाला. पण यावर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानी विदेश मंत्र्यांकडून भारताला प्रत्यूत्तर देण्याच्या बाबी मीडियामध्ये छापण्यात आल्या आहेत. सगळ्याच महत्त्वाच्या संस्थानांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या सीमेवर घुसून भारतीय वायुसेनेनं एक मोठी मोहीम फत्ते केली.

बीबीसी वर्ल्डने या हल्ल्यानंतर पाकिस्तानी प्रमुखांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यांवर जास्त जोर दिला आहे. बीबीसीने पाकिस्तानच्या बाजूने त्यांच्या सीमेमध्ये घुसून भारतीय वायुसेनेच्या विमानांना रोखून धरलं आणि परत पाठवलं अशा बातम्यांना प्रमुखता दिली आहे. बीबीसीनुसार, भारतीय वायुसेनेनं बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या एका ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला. ज्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानने त्यांना परत पाठवलं.

सीएनएन इंटरनॅशनलने भारताचा उल्लेख करत लिहलं की, भारताने पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला. पण यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढणार आहेत.

संबंधित बातम्या : AirStrikes करण्याआधी भारताने वापरले हे ड्रोन, पाकचे रडार झाले ठप्प

दी न्यूयॉर्क टाइम्सनुसार, भारताने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून हवाई हल्ला केला. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या विधानांना प्रामुख्याने प्रकाशित केलं आहे.

Loading...

वॉशिंग्टन पोस्टनुसार, भारताचे लढाऊ विमान पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसले आणि त्यांनी हवाई हल्ला केला. वॉशिंग्टन पोस्टने भारताच्या बाजूने जारी करण्यात आलेल्या बाबींना प्राथमिकता दिली आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

खलीज टाइम्सने त्यांच्या वृत्तामध्ये  पाकिस्तानच्या बाजून बातम्या लावल्या आहेत. या हल्ल्यामध्ये एक नागरिक जखमी झाल्याच्या वृत्ताला त्यांनी प्राथमिकता दिली आहे. खलीज टाइम्ससाठी पाकिस्तानकडून भारताला देण्यात आलेल्या इशाऱ्याला प्राधान्य देण्यात आलं आहे.

अल जजीराचं कव्हरेजदेखील भारतीय आणि पाकिस्तानी मीडियापेक्षा कमी नाही आहे. झालेल्या हल्लासंबंधी ते संपूर्ण अपडेट देत आहेत. या हल्ल्यामध्ये दोन्ही देशांमधील तणाव आणखी ताणले जातील अशा बातम्या ते प्रकाशित करत आहेत.

संबंधित बातम्या : सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा - मोदींची प्रतिक्रिया

बांग्लादेशी मीडिया संस्थान 'दी डेली स्टार'ने लिहंल की भारताने पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या कॅम्पवर हवाई हल्ला केला आणि तब्बल 300 लोकांना मारंल. तर पाकिस्तानचा दावा आहे की, या हल्ल्यामध्ये कोणीही ठार झालं नाही आहे असं वृत्तदेखील प्रकाशित करण्यात आलं आहे.

रशिया मीडिया संस्थान आरटीने दोन्ही देशांच्या मोठ्या विधानांना प्रकाशित केलं आहे. पाकिस्तानी विदेश मंत्र्यांकडून भारताला सावध राहण्याचा आणि हल्ल्यासाठी तयार राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बातम्या रशियामध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: भारत-पाक सीमेवर राहणारे लोक हादरले; म्हणाले, 'आम्हाला वाटलं युद्ध सुरू झालं'

असा झाला Air Srrike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

Air Strikeचा निर्णय मोदींचा

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.


IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...