• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Miracle! डोळे, नाक आणि तोंड नसलेलं बाळ आलं जन्माला, डॉक्टरांनी सोडली होती आशा आणि मग...

Miracle! डोळे, नाक आणि तोंड नसलेलं बाळ आलं जन्माला, डॉक्टरांनी सोडली होती आशा आणि मग...

डोळे, नाक आणि तोंडही नसलेलं एक बाळ (Baby born with no eyes, nose and face) जन्माला आल्यानंतर त्याच्या जगण्याची आशा डॉक्टरांनी सोडली होती.

 • Share this:
  ब्रझिलिया, 10 ऑक्टोबर : डोळे, नाक आणि तोंडही नसलेलं एक बाळ (Baby born with no eyes, nose and face) जन्माला आल्यानंतर त्याच्या जगण्याची आशा डॉक्टरांनी सोडली होती. मात्र प्रत्यक्षात (Miracle of nature) चमत्कार झाला. तुमचं बाळ फार काळ जगणार नाही, असं सांगितल्यानंतर बाळाच्या आईवडिलांनाही जबर धक्का बसला होता. दुःखातून सावरत बाळावर अंत्यसंस्कार करण्याची मानसिक तयारीही केली होती. मात्र प्रत्यक्षात एक वेगळाच चमत्कार घडला. जन्माला आलं विचित्र बाळ ब्राझीलमध्ये एक असं बाळ जन्माला आलं ज्याला चेहराच नव्हता. अत्यंत दुर्मिळ अशा ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम नावाचा आजार बाळाला झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारात चेहऱ्यावरील जवळपास 40 हाडांचा विकासच होत नाही. हा अत्यंत दुर्मिळ आजार असून त्यात बाळं दगावण्याची शक्यताच अधिक असते. या आजारामुळे चेहऱ्यावरील नाक, कान आणि तोंड या अवयवांचा विकास होत नाही. असं बाळ जन्माला आल्यामुळे ते काही तासच जिवंत राहू शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. प्रत्यक्षात मात्र या बाळानं डॉक्टरांचं म्हणणं खोटं ठरवलं. मुलीवर झाली सर्जरी ही मुलगी आजाराशी संघर्ष करत राहिली आणि आईवडिलांच्या संगोपनामुळे बरी होत गेली. मुलगी थोडी मोठी झाल्यावर तिच्या नाक, गाल आणि कानावर सर्जरी करण्यात आल्या. आता ही मुलगी 9 वर्षांची असून आरोग्यपूर्ण आयुष्य जगत असल्याचं तिच्या आईवडिलांनी सांगितलं आहे. वडील रोनाल्डो आणि आई जोसिलिन यांनी आपल्या मुलीचा नववा वाढदिवस हॉस्पिटलमध्येच साजरा केला. हे वाचा -VIDEO: जिलेटीनच्या कांड्यांनी घडवला स्फोट; नगरमध्ये एटीएम फोडून लाखो रुपये लंपास डॉक्टरांनी व्यक्त केलं आश्चर्य मुलगी जिवंत राहणं हा नैसर्गिक चमत्कार आणि तिच्या आईवडिलांच्या प्रेमाचाच परिणाम असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. विविध उपचार आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मदतीनं या मुलीचा चेहरा डेव्हलप होत असून भविष्यात ती एक सामान्य आयुष्य जगू शकेल, असा तिच्या आईवडिलांना विश्वास आहे.
  Published by:desk news
  First published: