Elec-widget

आश्चर्य!माकडाच्या हाती लागला मोबाइल,धडाधड केलं ऑनलाइन शॉपिंग!

आश्चर्य!माकडाच्या हाती लागला मोबाइल,धडाधड केलं ऑनलाइन शॉपिंग!

बीजिंगमधल्या एका प्राणीसंग्रहालयात एका बबूनच्या हातात मालकाचा मोबाइल लागला. याचा फायदा उठवत या माकडाने ऑनलाइन शॉपिंगही करून टाकलं.

  • Share this:

बीजिंग, 12 नोव्हेंबर :  बीजिंगमधल्या एका प्राणीसंग्रहालयात एका बबूनच्या हातात मालकाचा मोबाइल लागला. याचा फायदा उठवत या माकडाने ऑनलाइन शॉपिंगही करून टाकलं.

या प्राणीसंग्रहालयाची पर्यवेक्षिका बाहेर गेली होती त्यावेळी या माकडाने तिचा मोबाइल घेतला. त्याने ऑनलाइन शॉपिंग साइट असलेल्या 'ताओबाओ' वर जाऊन शॉपिंग केलं. या सगळ्याबद्दल वेबसाइटच्या कर्मचाऱ्यांनाही काही कळू शकलं नाही.

फोन विसरला

चीनमधल्या जिंगसू प्रांतात येनचेंगमध्ये एका प्राणीसंग्रहालयात ही घटना घडली. या झू कीपरने पाहिलं की या बबूनला खूप भूक लागली होती. त्या गडबडीत ही महिला फोन विसरून गेली.

मेंगमेंग जेव्हा परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं, त्यांच्या फोनमध्ये बरीच नोटिफिकेशन्स आली होती. ही सगळी नोटिफिकेशन्स ऑनलाइन शॉपिंग साइटकडून आली होती. त्यात लिहिलं होतं, तुमच्या सगळ्या ऑर्डर्स प्लेस केल्या आहेत. हे बघून त्या चमकल्याच. मग त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासलं तेव्हा हे माकड त्यांचा फोन वापरताना त्यांनी पाहिलं.

Loading...

फोनमध्ये नव्हता पासवर्ड

हा बबून वेळोवेळी फोनच्या स्क्रीनला टच करत होता. त्यावेळी या सगळ्या ऑनलाइन शॉपिंगचा उलगडा झाला. या बबूनने अत्यंत महागड्या वस्तू ऑर्डर केल्या होत्या.मेंगमेंग यांच्या फोनमध्ये पासवर्ड नव्हता. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगसाठी कोणत्याही ऑथेंटिकेशनची गरज पडली नाही. पण मेंगमेंग यांनीही यातली कोणतीही ऑर्डर कॅन्सल केली नाही.

=============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com