मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Australian Bushfire : ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या 50 कोटी प्राण्यांसाठी दिग्गज खेळाडू विकणार टोपी

Australian Bushfire : ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या 50 कोटी प्राण्यांसाठी दिग्गज खेळाडू विकणार टोपी

गेल्या चार महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात आग भडकली असून आतापर्यंत 50 कोटींहून अधिक प्राण्यांचा जीव गेला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात आग भडकली असून आतापर्यंत 50 कोटींहून अधिक प्राण्यांचा जीव गेला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात आग भडकली असून आतापर्यंत 50 कोटींहून अधिक प्राण्यांचा जीव गेला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

सिडनी, 06 जानेवारी : गतवर्षी अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत आहे. या आगीनं आतापर्यंत 50 कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियातील जीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदत केली जात आहे. यातच आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मदतीसाठी आपल्या आवडत्या टोपीचा लिलाव करणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न आपली आवडत्या टोपी विकणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकॉलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत 18 लोकांचा आणि जवळपास 50 कोटी प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या मध्य उत्तर भागात सर्वाधिका प्राणी आहेत. या भागालाही आगीने वेढले आहे. किनाऱ्याकडे वेगाने पसरणाऱ्या या आगीमुळे आतापर्यंत 200 हून अधिक घरांचे नुकसान झालं आहे. आपल्या देशाचा पूर्वपदावर आणण्यासाठी शेन वॉर्ननं हे पाऊल उचलले आहे.

वाचा-ऑस्ट्रेलियात भीषण आग, 5 कोटी प्राण्यांनी गमावला जीव

कसोटी क्रिकेटमध्ये 708 बळी

शेन वॉर्नच्या आवडत्या अशा ग्रीन कॅपला मागणीही जास्त आहे. शेननं आपल्या 145 कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत ही कॅप परिधान केली होती आणि कारकीर्दीत 708 बळी घेतले आहेत. या कॅपवर वॉर्नची स्वाक्षरीही मिळणार आहे. तसेच, ऑनलाइन लिलावामधून येणारी रक्कम बुशफायर अपीलला (Bushfire Appeal) दान करण्यात येणार आहे.

वाचा-एका सिक्ससाठी क्रिकेटपटू देणार 18 हजार! ‘हे’ आहे कारण

ऑस्ट्रेलियात भीषण आग

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली. राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. इथं 70 लाख लोक राहतात. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आगा लागली. यामुळे शहरातील 4 हजार लोकांना स्थलांतर करावं लागलं. जवळपास 1.23 कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसाथ झालं आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊसपेक्षाही आगीचे लोट उंच असल्याचं म्हटलं जात आहे. ही आग विझवण्यासाठी 74 हजार कर्मचारी काम करत आहेत. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

First published: