VIDEO : हेच बाकी राहिलं होतं! Coronavirus होऊ नये म्हणून प्रवाशाने विमानात केला कहर

VIDEO : हेच बाकी राहिलं होतं! Coronavirus होऊ नये म्हणून प्रवाशाने विमानात केला कहर

कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत जवळ जवळ 2300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातून वाचण्यासाठी एक वेगळीच शक्कल एका प्रवाशानं लढवली.

  • Share this:

सिडनी, 23 फेब्रुवारी : कोरोनाव्हायरस (Coronavirus) या भयंकर विषाणुमुळे जगभरातील लोक हैराण आहेत. या व्हायरसमुळे आतापर्यंत जवळ जवळ 2300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक मिनिटाला 3-4 लोकांना कोरोनामुळं मृत्यू होतो आहे. चीनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर कोरोनाव्हायरसला घाबरलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी चक्क स्वत:ला त्यानं प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घेतले.

ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानात एक प्रवासी चक्क कोरोनाव्हायरसमुळं चेहऱ्याला मास्क लावून हातात हातमोजे आणि प्लास्टिकची हूड देखील घातला होता. याचा एक व्हिडिओ अलिसा नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर बर्‍याच लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओ अपलोड करताना अलिसाने लिहिले की, “हे दोघे लोक माझ्या मागे विमानात बसले आहेत. कोरोनाव्हायरसपासून घाबरून राहा”. कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

वाचा-धक्कादायक! तुमच्या WhatsApp ग्रुपची लिंक गुगलवर, कोणीही होऊ शकतं ADD?

वाचा-Indian Idol च्या सेटवर ढसाढसा रडला हिमेश रेशमिया, कारण वाचून व्हाल हैराण

वाचा-विराट, धोनी नाही तर ‘या’ खेळाडूमुळे टीम इंडियाला मिळाला बुमराह!

वाचा-कुणीतरी फेकून दिलेली चपाती त्यानं धुवून खाल्ली, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

कोरोनामुळं भारताचे 150 कोटींचे नुकसान

चिनी कोरोनाव्हायरसचा (China coronavirus) महाराष्ट्राला (Maharashtra) मोठा फटका बसला आहे. चिकन खाल्ल्यामुळे कोरोनाव्हायरस होतो, अशी अफवा पसरली आणि त्याची धास्ती घेऊन सर्वांनीच चिकनकडे पाठ फिरवली. परिणामी पोल्ट्री फार्म उत्पादकांचं तब्बल 150 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीपर्यंत चिकनचा विक्री दर ठीक होता. मात्र चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो अशी अफवा 4 फेब्रुवारीला पसरली आणि त्यामुळे चिकनचा खप कोसळला. हा खप 3,500 मेट्रिक टनवरून 2000 मेट्रिक टन म्हणजे तब्बल 20 लाख किलोवर आला. यामुळे तब्बल 150 करोडचं नुकसान झालं आहे. अंडे विक्रीवर मात्र काहीही परिणाम झालेला नाही.

First published: February 23, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या