सरकारविरुद्ध वृत्तपत्रांची अशीही मोहिम, पहिली पानं केली काळी!

सरकारविरुद्ध वृत्तपत्रांची अशीही मोहिम, पहिली पानं केली काळी!

देशात माध्यमांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी ऑस्ट्रेलियाती वृत्तपत्रांनी अभियान सुरू केलं आहे. यासाठीच देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी पहिलं पान काळं केलं.

  • Share this:

सिडनी, 21 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियात एक ऐतिहासिक अशी घटना घडली आहेत. सोमवारी सकाळी देशातील सर्व वृत्तपत्रांनी पहिलं पानावर काळा रंग छापला आहे. देशात माध्यमांवर घालण्यात येणाऱ्या बंधनाविरोधात हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियन सरकारकडून कठोर कायद्यामुळे लोकांपर्यंत माहिती आणि बातम्या पोहचवता येत नाहीत. त्यामध्ये अडथळा येत असल्याचं वृत्तपत्रांचे म्हणणे आहे.

जून महिन्यात ऑस्ट्रेलियातील माध्यम समूह असलेल्या ऑस्ट्रेलियान ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनच्या मुख्यालयावर आणि एका पत्रकाराच्या घरावर छापा मारण्यात आला होता. त्याविरोधात वृत्तपत्रांनी निषेध नोंदवण्यासाठी पानं काळी करण्याचा निर्णय घेतला. व्हिसलब्लोअर्सनी लीक केलेल्या माहितीच्या आधारे कारी लेख प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर छाप्याची कारवाई झाली होती.  त्यानंतर वृत्तपत्रांनी सुरू केलेल्या या अभियानात टीव्ही, रेडिओसह ऑनलाइन समूहानेसुद्धा पाठिंबा दिला आहे.

गेल्या 20 वर्षांपासून ऑस्ट्रेलियात कायदा इतका कडक करण्यात आला आहे की शोध पत्रकारिता बंद होण्याच्या मार्गावर पोहचली आहे. गेल्या वर्षी आणलेल्या नव्या कायद्यानंतर माध्यम समुहांकडून पत्रकार आणि व्हिसलब्लोअर्सना संवेदनशील प्रकरणात वृत्तांकन करण्यास मुभा दिली जावी अशी मागणी केली जात आहे.

सोमवारी देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी पहिल्या पानांवर काळ्या रेघा ओडल्या आणि त्यावर एक लाल शिक्का मारला. ज्यावर सिक्रेट असं लिहलं होतं. या वृत्तपत्रांचं म्हणणं आहे की, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुले पत्रकारीतेवर निर्बंध येत आहेत. यामुळे देशात गोपनीयतेची संस्कृती तयार झाली आहे. याबाबत सरकारने म्हटलं की, माध्यमांच्या स्वातंत्र्याचे आम्ही समर्थन करतो पण कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही

एबीसी, न्यूज कॉर्प, सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड, द एज यासह इतर वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर निषेध नोंदवला आहे.  एसीबीचे व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड अँडरसन यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात गोपनीय लोकशाही होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलं की, माध्यमांचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे पण कायद्याचे राज्य राहिलं पाहिजे. कायदा मलाही लागू होतो. तो पत्रकार किंवा इतरावरही तसाच लागू होतो असंही ते म्हणाले.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

Published by: Suraj Yadav
First published: October 21, 2019, 2:57 PM IST
Tags: australia

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading