मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनच्या आण्विक हल्ल्यापासून अमेरिकेच्या संरक्षण करण्यासाठी पाणबुडी करारावर स्वाक्षरी, ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचा दावा

चीनच्या आण्विक हल्ल्यापासून अमेरिकेच्या संरक्षण करण्यासाठी पाणबुडी करारावर स्वाक्षरी, ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचा दावा

अमेरिका आणि ब्रिटनसोबतच्या नवीन करारांतर्गत ऑस्ट्रेलिया आता अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करून अणुशक्तीवर चालणाऱ्या आठ पाणबुड्या घेणार आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 10 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी पंतप्रधान पॉल कीटिंग (Paul Keating) यांनी बुधवारी दावा केला की, अमेरिकन अणुशक्तीवर चालणार्‍या पाणबुड्या घेण्याचा हा करार अमेरिकेला चिनी अणुहल्ल्यापासून वाचवण्यासाठी होता. या करारामुळे ऑस्ट्रेलिया-चीन संबंध बदलले आहेत.

पॉल कीटिंग यांनी नॅशनल प्रेस क्लबला सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या कंझर्व्हेटिव्ह सरकारने 12 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा ऑस्ट्रेलियन ताफा तयार करण्यासाठी फ्रान्ससोबतचा 90 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरचा करार रद्द करून भयावह वर्तन केले आहे. त्याऐवजी अमेरिका आणि ब्रिटनसोबतच्या नवीन करारांतर्गत ऑस्ट्रेलिया आता अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करून अणुशक्तीवर चालणाऱ्या आठ पाणबुड्या घेणार आहे.

निशा दहिया प्रकरणात नवा ट्वीस्ट, VIDEO शेयर करत म्हणाली 'मी जीवंत आहे'

महत्त्वाचे म्हणजे पॉल कीटिंग यांनी 1991 ते 1996 पर्यंत मध्यवर्ती-डाव्या मजूर पक्षाच्या सरकारचे नेतृत्व केले होते. ते म्हणाले, 'चीनविरुद्ध आठ पाणबुड्या, त्याही 20 वर्षांत मिळतील. हे म्हणजे उंटाच्या तोंडातल्या जिऱ्यासारखे असेल. पॉल कीटिंग म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या चीनच्या किनाऱ्याजवळील कमी खोल समुद्रात अण्वस्त्रधारी चीनी पाणबुड्यांना रोखण्यासाठी तयार केल्या जातील.

भयंकर अपघात! पंक्चर झालेल्या ट्रकचा जॅक निसटला, महिलेसह दोघांचा चिरडून मृत्यू

कीटिंग म्हणाले, दुसर्‍या शब्दात सांगायचे तर चीनला अमेरिकेविरुद्ध आणखी एक अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता निर्माण होण्यापासून रोखण्यासाठी. त्यामुळे आता चीनसोबतचे आपले संबंध बदलले आहेत.

First published:

Tags: America, Australia, China