ढाका, 14 ऑक्टोबर : बांग्लादेशमध्ये दूर्गापूजेदरम्यान कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जिल्ह्यात हिंदूंच्या मंदिराची तोडफोड झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सालाबादप्रमाणे दूर्गापूजेचा सण साजरा (Attack on hindu devotee while doing Durga Pooja) करणाऱ्या हिंदू नागरिकांना कट्टरपंथीयांकडून अडथळे आणले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. भारताचा शेजारी असणाऱ्या बांग्लादेशात हा प्रकार घडला असून सरकारनं कडक (Bangladesh government takes action) पावलं उचलली आहेत. बांग्लादेशात दूर्गापूजेच्या मंडपात तोडफोड केल्याची घटना समोर आल्यानंतर शेख हसीना सरकारनं सुरक्षा व्यवस्था (Sheikh Hasina government increase security) वाढवली असून उन्मादी लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
दूर्गापूजेत अडथळे
बांग्लादेशातील कमिला जिल्ह्यात दूर्गापूजेत अडथळे आणण्याचे सर्वाधिक प्रकार घडले आहेत. एका पूजेच्या ठिकाणी काही जणांनी कुराणाचा अपमान केल्याचा दावा करत पूजा मंडपांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अफवेमुळे काही ठिकाणी हिंसाचारही उफाळून आल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार चांदपूर जिल्ह्याच्या हाजीगंज, चट्टोग्राममधील बंशखली, चपैनवाबगंजमधील शिवगंज आणि कॉक्स बाजार भागातील काही मंदिरांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
सोशल मीडियावर हल्ल्यांची चर्चा
हिंदूंच्या प्रार्थनास्थळांवर आणि दूर्गापूजेच्या मंडपांवर हल्ले झाल्याच्या घटनांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चांदपूरमध्ये तिघांची यात हत्या झाल्याची माहिती समोर येत असून स्थानिक पोलिसांनी मात्र याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
हे वाचा -OMG...लेकाची करामती आईच्या अंगाशी, बोलवावं लागलं थेट अग्निशमन दलाला
बांग्लादेशात सुरक्षा वाढवली
थेट पंतप्रधानांकडून आदेश आल्यानंतर बांग्लादेशमधील सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असून यापुढे कुठलेही दंगे होऊ नयेत यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्व महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून प्रत्येकाला सुरक्षितपणे आपापल्या धर्माचं पालन करण्यात कुठलाही अडथळा येणार नाही, असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. दंगा करणाऱ्या आणि अशांतता पसरवणाऱ्या असामाजिक घटकांना अटक करण्याचं सत्र सुरू करण्यात आलं आहे.
तणाव वाढला
पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली असली, तरी यामुळे तणाव वाढला आहे. अनेक ठिकाणी हिंदूंमध्ये दहशतीचं वातावरण असून दूर्गापूजेच्या ठिकाणी अधिक सुरक्षेची मागणी करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.