News18 Lokmat

अमेरिकेत टेक्सासमध्ये हल्ला;26 ठार

सूदरलँड स्प्रिंग्ज नावाच्या गावात हा हल्ला झालाय. रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी अनेक लोक जमतात. याचाच फायदा घेऊन हल्लेखोर चर्चमध्ये शिरला. आत शिरून त्याने हल्ला केला. 23 जण चर्चमध्येच ठार झाले, तर 3 जणांना चर्चच्या बाहेर गोळ्यांचा सामना करावा लागला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2017 10:04 AM IST

अमेरिकेत टेक्सासमध्ये हल्ला;26 ठार

06 नोव्हेंबर:  अमेरिकेच्या टेक्सास राज्यात चर्चमध्ये हल्ला झालाय.गेल्या काही दिवसात अमेरिकेत झालेला हा तिसरा हल्ला आहे.

टेक्सासच्या एक चर्चमध्ये झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. सूदरलँड स्प्रिंग्ज नावाच्या गावात हा हल्ला झालाय. रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी अनेक लोक जमतात.   याचाच फायदा घेऊन हल्लेखोर चर्चमध्ये शिरला.  आत शिरून त्याने हल्ला केला. 23 जण चर्चमध्येच ठार झाले, तर 3 जणांना चर्चच्या बाहेर गोळ्यांचा सामना करावा लागला. डेव्हिन पॅट्रिक केली असं हल्लेखोराचं नाव आहे. हल्लेखोर जेव्हा चर्चमधून बाहेर पडला, तेव्हा एका स्थानिकानं रायफलनं त्याला आव्हान दिलं. हल्लेखोर गाडीत बसून पसार झाला. पण काही अंतरावर त्याच गाडीत त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर गोळीनं झालेली जखम आढळली. स्थानिकांनी हल्लेखोराला हटकल्यामुळे मृतांचा आकडा वाढला नाही, असंही पोलिसांनी सांगितलंय.

काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क आणि कोलोरॅडोमध्येही असेच हल्ले करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 09:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...