मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पाकिस्तानात 15 वर्षांच्या हिंदू मुलीचं अपहरण, धर्मपरिवर्तन करून लावलं लग्न

पाकिस्तानात 15 वर्षांच्या हिंदू मुलीचं अपहरण, धर्मपरिवर्तन करून लावलं लग्न

 जैकबाबाद जिल्ह्यात एका 15 वर्षांच्या हिंदू मुलीचं अपहरण करून तिला मुस्लिम बनविण्यात आलं आणि लग्न लावण्यात आलं.

जैकबाबाद जिल्ह्यात एका 15 वर्षांच्या हिंदू मुलीचं अपहरण करून तिला मुस्लिम बनविण्यात आलं आणि लग्न लावण्यात आलं.

जैकबाबाद जिल्ह्यात एका 15 वर्षांच्या हिंदू मुलीचं अपहरण करून तिला मुस्लिम बनविण्यात आलं आणि लग्न लावण्यात आलं.

कराची 23 जानेवारी : पाकिस्तानात अल्‍पसंख्‍यक असलेल्या हिंदुंवरच्या (Hindus in Pakistan) अत्‍याचारांच्या (Atrocities) घटना अजुनही सुरूच आहेत. पाकिस्तानी हिंदू मुलींचं अपहरण करून त्यांचं धर्म परिवर्तन केलं जातं आणि मुस्लिम व्यक्तिंशी त्यांना विवाह करण्यास भाग पाडलं जातं. अशा घटना सातत्याने घडत असल्यानं कायम वाद निर्माण होतो. या अत्याचाविरुद्ध काही महिन्यांपूर्वी अल्पसंख्याक समाज रस्त्यावरही आला होता. मात्र या अत्याचारांमध्ये काही घट होत नाही तर उलट वाढत आहे.काही दिवसांपूर्वीच मेडिकलचं शिक्षण घेत असलेल्या नमृता चंदानी हिची हत्या झाली होती. हे प्रकरण जगभर गाजलं होतं.

आता सिंध प्रांतातून एक नवं प्रकरण समोर येतंय. जैकबाबाद जिल्ह्यात एका 15 वर्षांच्या हिंदू मुलीचं अपहरण करून तिला मुस्लिम बनविण्यात आलं आणि तिचं मुस्लिम व्यक्तिशी लग्न लावण्यात आल्याची घटना घडलीय. महक कुमारी (mahak Kumari) असं तिचं नाव असून 9 व्या वर्गात ती आहे. महकच्या वडिलांनी तिच्या अपहरणाची तक्रार दिलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रजा सोलंगी यांनी तिचं अपहरण केलं त्यानंतर तिला मुस्लिम बनविण्यात आलं आणि लग्नही करण्यात आलंय.

केम छो ट्रम्प? 'हाउडी मोदी' नंतर ट्रम्प आणि मोदी पुन्हा येणार एका मंचावर

या तक्रारीनंतर पोलिसांनी महकचा शोध घेऊन तिला न्यायालयात हजर केलं. सिंध मधले अल्पसंख्याक मंत्री हरिराम किशोरी लाल (Hariram Kishori Lal) यांनी मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना पूर्ण संरक्षण देण्याचं आश्वासन दिलंय. गेली अनेक वर्ष पाकिस्तानात सातत्याने अल्पसंख्याक समुदायावर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. सरकार फक्त तोंड देखलं आश्वासन देतं मात्र काहीही कारवाई करत नाही असा आरोप मानवाधिकार संघटनांनी केलाय.

First published:
top videos

    Tags: Pakistan