पाकिस्तानमध्ये न्यूक्लियर गॅस लीक होऊन 6 जणांचा मृत्यू, 100 जणांवर उपचार सुरू, नेमकी कशी घडली घटना?

पाकिस्तानमध्ये न्यूक्लियर गॅस लीक होऊन 6 जणांचा मृत्यू, 100 जणांवर उपचार सुरू, नेमकी कशी घडली घटना?

पाकिस्तानमधील कराचीमध्ये न्यूक्लियर गॅस लीक होऊन 6 जणांचा मृत्यू झालाय. तर 100 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

कराची, 17 फेब्रुवारी : पाकिस्तानातील कराचीमध्ये गॅल लीक झाल्याची घटना घडली आहे. कराचीमध्ये विषारी गॅस लीक झाल्याने आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूक्लियर गॅस ( Nuclear gas ) लीक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हे गॅस लीक होण्याची घटना घडली तो परिसर कराची न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनच्या जवळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास करण्यासाठी न्यूक्लियर बयोलॉजिकल केमिकल डॅमेज टीम रवाना झाली आहे.

प्रशासनाकडून अद्याप योग्य मृतांचा आकडा समजू शकलेला नाही. दरम्यान गॅस लीक झाल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे. जिओ टिव्हीने दिलेल्या माहितीनुसार 100 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान, ही घटना कशी घडली यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पाकिस्तामधील द डॉन या वृत्तपत्रानुसार, गॅस लीक झाल्याने अनेक लोक बेशुद्ध झाले आहेत. त्या सर्वांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. स्थानिक पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जवळच्याच एका बंदरावर कार्गो जहाज आलं होतं. त्यामध्ये भाजीपाला होता. ज्यावेळी कंटेनर उघडण्यात आलं त्याचवेळी गॅस लीक व्हायला सुरुवात झाली. ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ लागली.

आता या संपूर्ण प्रकाराचा तपास केला जात आहे. नेमका कशामुळे हा गॅस लीक झाला याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा- डोनाल्ड ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये तयारी; नीलगाय, कुत्र्यांना करणार गायब

First published: February 17, 2020, 8:54 AM IST

ताज्या बातम्या