Home /News /videsh /

जगात Omicron चा हाहाकार... मात्र क्रूझवर सुरुये 'ड्रग्ज, सेक्स,'Dirty डान्स' तयारी

जगात Omicron चा हाहाकार... मात्र क्रूझवर सुरुये 'ड्रग्ज, सेक्स,'Dirty डान्स' तयारी

अटलांटिस इव्हेंट्स (Atlantis Events ) टूर ऑपरेटरकडून क्रूझवर समलैंगिकांसाठी (lesbian cruise party) एक मोठी पार्टी देण्यात येत आहे. ही पार्टी मियामी, फ्लोरिडा येथे एक आठवडाभर चालणार असून यात सुमारे 5,500 लोक सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

पुढे वाचा ...
न्युयॉर्क, 15 जानेवारी : जगावर कोरोनाचं (Coronavirus) संकट आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉन (Omicron) विषाणूने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक गतीने होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, यातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंपनीच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त अटलांटिस इव्हेंट्स (Atlantis Events ) टूर ऑपरेटरकडून क्रूझवर समलैंगिकांसाठी (lesbian cruise party) एक मोठी पार्टी देण्यात येत आहे. ही पार्टी मियामी, फ्लोरिडा येथे एक आठवडाभर चालणार असून यात सुमारे 5,500 लोक सहभागी होणार असल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. न्यूयॉर्क टाईम्सनुसार, रॉयल कॅरेबियनच्या ‘ओअसिस ऑफ द सीझ’मध्ये होणाऱ्या या गे पार्टीसाठी लोकांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. जर्मनीतील ग्राफिक डिझायनर आंद्रे मेयर नावाच्या एका व्यक्तीनं म्हटलं, की आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्याची ही वेळ आहे. आम्ही लस घेतली असून या पार्टीत जाऊ शकतो. यासाठी मी 2 लाख 97 हजार रुपयांहून अधिक रक्कम भरली आहे. तब्बल दोन वर्षानंतर आमच्या समुदायाचा हा प्रोग्रॅम होत असून मी यात नक्कीच सहभागी होणार आहे. याशिवाय, काही जण पार्टीत सहभागी न होण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, असे केल्यास त्यांना कंपनीच्या धोरणानुसार रिफंड मिळणार नाही. यासाठी त्यांनी 60 दिवसांपूर्वीच तिकिट रद्द करायला हवं होतं. आता तिकीट रद्द केल्यास त्यांना रिफंड मिळणार नाही आणि लाखो रुपयांचं नुकसान होईल. आम्ही क्रूझ लाइनसह करार केला असून तो रद्द किंवा बदलला जाऊ शकत नाही. त्यामुळे तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळणार नसल्याचे अटलांटिस इव्हेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिच कॅम्पबेल यांनी सांगितले. कंपनीच्या या करारावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बोस्टनमध्ये वास्तव्यलाा असलेले डान्स टीचर इजेन मॉर्गन यांनी म्हटलं, की मी 2 लाख 82 हजार रुपयांचे तिकीट खरेदी केले आहे. पण मी पार्टीत न जाण्याचा निर्णय घेतला आणि फेसबूकच्या माध्यमातून तिकीट विकण्याचा विचार केला. आता मला हे तिकिट अत्यंत स्वस्त दरात विकावे लागत असून मला फक्त 1 लाख 10 हजार रुपये मिळत आहेत. तसेच मला या पार्टीत जाण्याची इच्छा होती. माझ्या मित्रांनीदेखील मला यासाठी पटवलं होतं. मात्र, पार्टी करून मला आजारी पडण्याची अजिबात इच्छा नाही. पार्टीत गेल्यास मला कोरोना होईल, या भीतीने मला रात्रभर झोपदेखील लागत नसल्याचे मॉर्गनने म्हटलं. कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी पाहता, अमेरिका देश आघाडीवर आहे. लोकांनी क्रूझ जहाजांवर प्रवास करू नये, असा इशारा येथे देण्यात आला आहे. मात्र, लोक बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर लसीकरण झालेल्या व्यक्ती सुरक्षित असल्याचा दावा अटलांटिस इव्हेंट्सने केला आहे.
First published:

Tags: Corona, Drugs

पुढील बातम्या