काबुलमध्ये बॉम्बस्फोट २० जण जागीच ठार तर १२ गंभीर जखमी

काबुलमध्ये बॉम्बस्फोट २० जण जागीच ठार तर १२ गंभीर जखमी

या घटनेची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही

  • Share this:

काबुल, ०६ सप्टेंबर- काबुल येथे स्पोर्ट्स क्लबच्या आत आणि बाहेर अशा दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. या घटनेत २० जण जागीच ठार झाले तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्पोर्ट्स क्लबच्या आत पहिला स्फोट झाला तेव्हा काही पत्रकार आणि सुरक्षा कर्मचारी यात अडकले. पुढच्या महिन्यात याचठिकाणी निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दहशत पसरवण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे म्हटले जात आहे.

क्लबच्या आत स्फोट झाला त्यात तीनजण जखमी झाले. मात्र कल्बच्या बाहेर झालेल्या स्फोटात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली. या घटनेची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पहिला स्फोट झाल्यानंतर त्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार दुसऱ्या स्फोटात अडकले यात अनेक पत्रकार आणि कॅमेरामन जखमी झाले.

VIDEO : भरसमुद्रात 'बर्निंग बोटी'चा थरार, एकाचा होरपळून मृत्यू

First published: September 6, 2018, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading