• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • शुक्रवारच्या प्रार्थनेदिवशीच शिया मशिदीवर बाँब हल्ला, किमान 100 ठार झाल्याची भीती

शुक्रवारच्या प्रार्थनेदिवशीच शिया मशिदीवर बाँब हल्ला, किमान 100 ठार झाल्याची भीती

नमाज सुरू असतानाच मशिदीत झालेल्या शक्तीशाली (At least 100 feared to be dead in bomb blast) बॉम्बस्फोटात किमान 100 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 • Share this:
  काबुल, 8 ऑक्टोबर: नमाज सुरू असतानाच मशिदीत झालेल्या शक्तीशाली (At least 100 feared to be dead in bomb blast) बॉम्बस्फोटात किमान 100 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील कुंदुंजमध्ये (Blast in Kunduj province of Afghanistan) हा शक्तीशाली स्फोट झाला. यावेळी मशिदीच्या परिसरात उपस्थित असणाऱ्या किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. नेमका कितीजणांचा मृत्यू झाला, याची अधिकृत घोषणा अद्याप अफगाणिस्तानकडून करण्यात आलेली नसली तरी स्फोटाची तीव्रता पाहता किमान 100 जण या स्फोटात दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आयसीस-खुरासानवर संशय या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुठल्याही संघटनेनं स्विकारलेली नाही. मात्र अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून सातत्यानं हल्ले घडवण्याचं काम आयसीस-खुरासान ही संघटना करत असून याच संघटनेवर सर्वांचा संशय असल्याची चर्चा आहे. विशेषतः मध्य आशियातील शिया विरुद्ध सुन्नी वादाचाही पार्श्वभूमी या स्फोटाला असल्याची चर्चा आहे. शिया विरुद्ध सुन्नी वाद आयसीस ही सुन्नी समर्थक दहशतवादी संघटना असून या संघटनेनं कायमच शिया पंथियांवर हल्ले केले आहेत अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी झालेला हल्ला हादेखील शिया पंथियांच्या प्रार्थना स्थळावर करण्यात आला आहे. त्यामुळे आयसीस संघटनेच्या खुरासान शाखेनंच हा हल्ला घडवून आणला असावा, असा संशय तालिबानमधील सूत्रांनी व्यक्त केला आहे. नमाज सुरू असतानाच झाला स्फोट कुंदुज प्रांतात गोझर-ए-सईद मशिदीत नमाज सुरू असतानाच हा स्फोट घडवून आणण्यात आला. अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्य असणारा शिया समाज या मशिदीत दर शुक्रवारी प्रार्थनेसाठी एकत्र येत असतो. हेच निमित्त साधत हा स्फोट घडवण्यात आला आहे. नमाज सुरु असतानाच स्फोट घडल्याचं आणि अनेकांचा जागीच तडफडून जीव गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. मदतकार्य सुरू स्फोट झाल्यानंतर अनेकजण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. या परिसरात अक्षरशः प्रेतांचा खच पडला आहे. किमान 100 जणांचा यात मृत्यू झाल्याची भिती आहे. हा आकडा खरा ठरला तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर झालेला हा सर्वात मोठा स्फोट ठरणार आहे.
  Published by:desk news
  First published: