मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अद्भुत! शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीसारखा हुबेहुब दिसणारा ग्रह, आपल्यापासून इतका आहे दूर

अद्भुत! शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीसारखा हुबेहुब दिसणारा ग्रह, आपल्यापासून इतका आहे दूर

शास्त्रज्ञांनी एक अद्भुत शोध लावला आहे. वाचा आपल्यापासून किती दूर आहे हा नवा ग्रह.

शास्त्रज्ञांनी एक अद्भुत शोध लावला आहे. वाचा आपल्यापासून किती दूर आहे हा नवा ग्रह.

शास्त्रज्ञांनी एक अद्भुत शोध लावला आहे. वाचा आपल्यापासून किती दूर आहे हा नवा ग्रह.

  • Published by:  Manoj Khandekar
वॉशिंग्टन, 14 मे : शास्त्रज्ञांनी एक अद्भुत शोध लावला आहे. न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीपासून 25 हजार प्रकाश वर्षांच्या अंतरावर पृथ्वीसारखा ग्रह (exoplanet) सापडला आहे. या ग्रहावर खडक सापडले आहेत जे इतर ग्रहांपेक्षा वेगळे करतात. दरम्यान या ग्रहाचे नाव ठेवण्यात आलेले नाही आहे. मात्र ज्या मायक्रोलेन्सींगमधून तो शोधला गेला त्याचे नाव OGLE-2018-BLG-0677 आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, हा ग्रह सूर्याच्या दहाव्या हिस्स्याच्या आकारा एवढा आहे. न्यूझीलंडमधील कॅंटरबरी विद्यापीठातील शास्त्रज्ञ म्हणतात की असे आश्चर्यकारक शोध केवळ 10 लाखांमधून एकदाच लागतात. खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सौर यंत्रणेच्या बाहेर असे 4 हजार exoplanet सापडले आहेत. यातील फक्त एक तृतीयांश ग्रह खडकाळ आहेत. यातील काही ग्रह पृथ्वीच्या कक्षासारखे आहेत. या ग्रहाचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांचे मते, हा ग्रह फिरत आहे तो तारा इतका छोटा आहे की त्याबद्दल फारसे समजू शकले नाही. यामुळं अद्याप निश्चित पणे हे सांगितले जाऊ शकत नाही की, या तारेचे वस्तुमान कमी आहे की जास्त. वाचा-वाटेतील एकही झाड न जाळता याठिकाणी पसरली विचित्र आग, VIDEO पाहून नेटकरी हैराण न्यूझीलंडच्या कॅन्टरबरी युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन प्रकाशित करणाऱे मुख्य वैज्ञानिक हिरेरा मार्टिन म्हणतात की नव्याने सापडलेल्या ग्रहाचा आकार, कक्षा आणि स्थान या शोधास खास बनवते. वाचा-Coronavirus पासून वाचण्यासाठी एकच सुरक्षित जागा, NASA ने दिली माहिती
First published:

Tags: Planet

पुढील बातम्या